Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' हि ' एक गोष्ट उद्धव ठाकरे यांनी केली तर मोदी उद्धव यांना पुन्हा बरोबर घेतील : किरीट सोमय्या

' हि ' एक गोष्ट उद्धव ठाकरे यांनी केली तर मोदी उद्धव यांना पुन्हा बरोबर घेतील : किरीट सोमय्या 


उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या गैरकृत्यांचं प्रायश्चित घेतलं आणि यापुढे लुटमार आणि माफियागिरी न करण्याचा संकल्प केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना पुन्हा महायुतीत घेतील, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केले.

भाजपसोबत पुन्हा यायचं असेल तर उद्धव ठाकरे  यांना मुस्लीम लांगुलचालन सोडून पुन्हा हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारावी लागेल, असेही सोमय्या यांनी म्हटले. ते सोमवारी एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी किरीट सोमय्या यांना भाजपने आधी आरोप केलेल्या आणि नंतर पक्षात घेऊन पवित्र केलेल्या नेत्यांविषयीची भूमिका विचारण्यात आली. त्यावर किरीट सोमय्या यांनी म्हटले की, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांना आम्ही पक्षात घेतले ही बाब मला मान्य आहे. पण राजकारणात व्यापक हितासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात, त्या अपरिहार्य असतात, अशी भूमिका किरीट सोमय्या यांनी मांडली. 

मलाही रोज सकाळी उठल्यावर हाच प्रश्न पडतोय. ज्यांचा आरोप आपण बाहेर काढला त्या घोटाळेबाज आणि बदमाशांच्या शेजारी बसावं लागतंय, त्याचं स्वागत माझ्या पक्षात होतंय हे योग्य आहे का असं रोज वाटतंय. पण मी केवळ घोटाळे बाहेर काढून ते तपास यंत्रणा आणि न्यायालयापर्यंत पोहोचवू शकतो. त्यापुढे मी काही करु शकत नाही. या सगळ्याबाबत माझ्या बायकोने दिलेला एक सल्ला मी नेहमी लक्षात ठेवतो. तिने मला सांगितलं आहे की, तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, भविष्यात कधीही त्यांनी बाजू घेऊ नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. या सल्ल्याचे मी तंतोतंत पालन करत आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

भ्रष्टाचारी नेते आमच्याकडे आल्याने त्यांच्यावर वचक बसला: किरीट सोमय्या

किरीट सोमय्या यांना त्यांनी आरोप केलेल्या आणि भाजपमध्ये आलेल्या नेत्यांविषयी विचारण्यात आले. त्यावर सोमय्या यांनी म्हटले की, भ्रष्टाचाराचे नेते आमच्याकडे आल्याने ते पवित्र झाले असे मी म्हणणार नाही. पण मला एक निश्चित समाधान आहे की, गेल्या काही काळात जनतेमध्ये संदेश गेला की, एखाद्या राजकारण्यालाही शिक्षा होऊ शकते. अनेक राजकारण्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त झाली, अनेकांना दंड झाला. काही जणांवर अद्याप कारवाई सुरु आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.

भ्रष्टाचारी नेते आमच्याकडे आल्यावर त्यांच्यावर वचक बसला आहे. यापूर्वी ते राजरोसपणे मोठी लूट करत होते, आता ती लूट करण्याचे प्रमाण मर्यादित असेल. या नेत्यांनी पुन्हा भ्रष्टाचार केला तर पंतप्रधान मोदी त्यांना पुन्हा माफ करणार नाहीत, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.