Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐकावं ते नवलंच! चार्जरसाठी माय लेकीची हाणामारी :, एकमेकींना इतकं चोपलं की पोलीसात पोचलं प्रकरण

ऐकावं ते नवलंच! चार्जरसाठी माय लेकीची हाणामारी :, एकमेकींना इतकं चोपलं की पोलीसात पोचलं प्रकरण 


नवी दिल्ली : आई आणि मुलीचं नातं अतिशय खास असतं. दोघींमध्ये अनेकदा अगदी घट्ट मैत्रीही असते. दोघीही एकमेकींच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. मात्र, आता आई आणि मुलीच्या भांडणाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे.


यात दिल्लीतील वसंत विहार परिसरात मोबाईल चार्जरवरून आई आणि मुलीमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीने आपल्याला मारहाण केली आणि चावा घेतला असा आरोप आईने केला आहे. दुसरीकडे, आईने मोबाईल चार्जर घेण्यासाठी जबरदस्तीने खोलीत प्रवेश केला. त्यानंतर चार्जर देण्यास नकार दिल्याने आईने तिला मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी क्रॉस एफआयआर नोंदवला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, "आईने मारहाण केल्याबद्दल पीएस वसंत विहार येथे पीसीआर कॉल आला होता. कॉल येताच आयओ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. जिथे कॉलर साक्षी कुमार (22) ) होती. इथे तिचे वडील संतोष कुमार (जे भारतीय नौदलात कॅप्टन आहेत) आणि तिची आई वंदना कुमार (48) हे उपस्थित होते. या सर्वांच्या चौकशीत समोर आलं आहे की, त्यांच्यात अनेक वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे.

पोलिसांनी पुढे सांगितलं की, "चौकशी केली असता असं आढळून आलं की, 31मार्च रोजी सकाळी आई आणि मुलीमध्ये मोबाईल चार्जरवरून वाद झाला आणि त्यांच्यात हाणामारी झाली. दोघींनी एकमेकींवर मारहाणीचे आरोप केले आहेत. फोन करणारी साक्षी हिने आई वंदना कुमार विरोधात वक्तव्य केलं होतं, तर दुसरीकडे तिच्या आईने पती आणि मुलीविरुद्ध मारहाण आणि घरगुती हिंसाचाराची तक्रार दिली होती. दोघींची आरआर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पोलीस MLC ची वाट पाहत आहेत.

वंदना कुमार यांच्या तक्रारीवरून त्यांच्या पती आणि मुलीविरुद्ध आयपीसी कलम ३२३/३४१/१०९ अंतर्गत एफआयआर क्रमांक ५६/२४ दाखल करण्यात आला आहे. तसेच साक्षी कुमारच्या तक्रारीवरून तिच्या आईविरुद्ध एफआयआर क्रमांक ५७/२४, कलम ३२३/३४१/५०६ आयपीसी नोंदवण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.