Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी 'कलंकित'; भाजपमध्ये येताच 'चकचकीत'

भ्रष्टाचाराच्या आरोपांनी 'कलंकित'; भाजपमध्ये येताच 'चकचकीत'


नवी दिल्ली: केंद्रात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आल्यापासून (२०१४) कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईचा तडाखा बसलेल्या २५ प्रमुख राजकारण्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.


त्यांत काँग्रेसचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार, तृणमूल काँग्रेसचे तीन; तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) चे दोन; तर समाजवादी पक्ष आणि वायएसआर काँग्रेस पार्टीच्या प्रत्येकी एका नेत्याचा समावेश आहे. यापैकी २३ जणांच्या राजकीय कृतीमुळे (भाजपमध्ये प्रवेश) त्यांना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे 'दि इंडियन एक्स्प्रेस'ने केलेल्या संशोधनातून निदर्शनास आले.

२३ पैकी तीन प्रकरणे बंद करण्यात आली आहेत, तर अन्य २० प्रकरणांची चौकशी थांबवण्यात तरी आली किंवा ती थंड बस्त्यात ठेवण्यात आली. या प्रकरणात गुंतलेल्यांच्या यादीतील सहा राजकीय नेते यावर्षी म्हणजे सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्याआधी भाजपमध्ये सामील झाले.

सन २०१४ नंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता येताच ईडी आणि सीबीआयने कारवाई केलेले ९५ टक्के प्रमुख राजकीय नेते विरोधी पक्षांचे होते, हे इंडियन एक्स्प्रेसने २०२२मध्येच शोध अभ्यासातून उघड केले होते. भ्रष्टाचारातील कथित आरोपींनी आपला पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागत नाही, हे वारंवार निदर्शनास आल्याने विरोधी पक्षांनी भाजपला 'धुलाई यंत्र' अशी उपमा दिली आहे. महाराष्ट्रात सन २०२२ आणि २०२३मध्ये जी राजकीय उलथापालथ झाली ती केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र असल्यामुळे, असे अलिकडील निष्कर्ष असे दर्शवतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.