सांगली : सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, लोकांना जखमी करणे, रस्त्यावर लोकांना अडवून मारहाण करणे, शासकीय वाहनांचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील गुन्हेगाराला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
अजय येबशब/येबसेफ हेगडे (वय ३४, रा. निमशिरगाव, ता. शिरोळ) असे हद्दपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. हेगडे याच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारहाण करणे, लोकांना जखमी करणे, रस्त्यावर लोकांना अडवून मारहाण करणे, शासकीय वाहनांचे नुकसान करणे, विनयभंग, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, दुखापत करणे असे गंभीर गुन्हे सांगली आणि जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. त्याच्यावर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव सांगली शहर पोलिसांनी मिरज प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला होता.त्या प्रस्तावाचे अवलोकन करून त्यावर सुनावणी घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी अजय हेगडे याला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याला हद्दपार करण्यात आले आहे. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, अमर नरळे, दीपक गट्टे, आसमा शेख आदींनी या कारवाईत भाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.