Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे : धक्कादायाक! एका प्रतिष्ठित कंपनीतील सामोसामध्ये आढळला निरोध आणि तंबाखूजन्य गुटखा

पुणे : धक्कादायाक! एका प्रतिष्ठित कंपनीतील सामोसामध्ये आढळला निरोध आणि तंबाखूजन्य गुटखा 


पिंपरी-चिंचवड शहरातील एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीन मध्ये सामोसा मध्ये निरोध आणि तंबाखूजन्य गुटखा आढळला. हा धक्प्रकादायक प्रकार 27 मार्च रोजी उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

फिरोज शेख उर्फ मंटू असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रहीम शेख, अझर शेख्म, मझर शेख, विकी शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा ली कंपनीचे सहायक महाव्यवस्थापक कीर्तिकुमार शंकरराव देसाई (वय 36) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका प्रतिष्ठित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्य पदार्थ पुरविण्याचा करार देसाई यांच्या कंपनीसोबत झाला आहे. देसाई यांची कंपनी पूर्वी मोरवाडी येथील मे. एसआरएस एंटरप्रायझेस या उप कंपनीकडून सामोसा घेत असे. त्याबाबत त्यांनी करार देखील केला होता. मात्र एसआरएस एंटरप्रायझेसने पुरवलेल्या एका सामोसा मध्ये प्रथमोपचार पट्टी मिळून आली. त्यामुळे देसाई यांनी एसआरएस सोबतचा करार रद्द केला.

त्यानंतर देसाई यांच्या कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स या कंपनीने सामोसा पुरविण्यासाठी मे. मनोहर एंटरप्रायझेस या कंपनीसोबत करार केला. देसाई यांच्या कंपनीची प्रतिष्ठा मलीन व्हावी तसेचा त्यांचा प्रतिष्ठित कंपनीतील करार रद्द व्हावा, यासाठी एसआरएसचे मालक रहीम शेख, अझर शेख आणि मझर शेख यांनी त्यांचे कामगार फिरोज आणि विकी यांना मनोहर एंटरप्रायझेस येथील कारखान्यात कामासाठी पाठवले.

एसआरएसच्या रहीम, अझर आणि मझर यांच्या सांगण्यावरून कामगार फिरोज आणि विकी यांनी सामोसा मध्ये निरोध टाकला. तसेच काही सामोसा मध्ये दगड, विमल पान मसाला तंबाखूजन्य गुटखा टाकला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.