Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; मुंबईत खळबळ

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; मुंबईत खळबळ

बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेन्ट बाहेर पहाटे ५ च्या सुमारास हा गोळीबार झाला. यावेळी तब्बल ४ वेळा फायरिंग झाल्याचे बोललं जात आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी हवेत राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. या एकूण सर्व घटनेनं मुंबईत खळबळ उडाली आहे. वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम सध्या घटनास्थळी तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता. या घटनेनंतर सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. फॉरेन्सिक टीमही या परिसरात दाखल झाली आहे. पोलिसांनी सलमान खान घराबाहेरील असलेला सीसीटीव्ही डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. तसेच, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे.

सलमान खानच्या घराबाहेर या गोळीबारामागे बिष्णोई गॅंग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण यापूर्वी सुद्धा सलमानला बिष्णोई गॅंगकडून सातत्याने धमक्या देण्यात येत होत्या. 2022 मध्ये सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये 'मुसेवाला जैसा कर देंगे', असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. त्यानंतर त्याला बिष्णोई गॅंग कडून धमक्यांचे सत्र सुरूच होते. त्यातच आता थेट सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.