Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दुबईत फरार झालेल्या पुण्यातील उद्योजकावर ईडीची कारवाई, कोट्यावधीची मालमत्ता जप्त

दुबईत फरार झालेल्या पुण्यातील उद्योजकावर ईडीची कारवाई, कोट्यावधीची मालमत्ता जप्त 


अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे येथील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकावर कारवाई केली आहे. मल्टी लेव्हल मार्केटिंग योजनेतून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पुणे येथील विनोद खुटे याला ईडीने चांगलाच दाणका दिला आहे.


ईडीने व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची २४ कोटी ४१ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. विनोद कुटे दुबईत फरार झाला आहे. या प्रकरणी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल यांनी पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

१०० कोटींची फसवणूक

विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे आणि अन्य लोकांवर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. ईडीने जून महिन्यात व्हीआयपीएस ग्रुपच्या पुणे, मुंबई आणि अहमदाबादमधील कार्यालयात छापे मारले होते. आता त्यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात ५८ बँकांतील २१.२७ कोटी रुपये आणि इतर ३.१४ कोटी रुपये जप्त केले आहे. विनोद कुटे आणि इतरांनी गुंतवणूकदारांची १०० कोटींपेक्षा जास्त रक्कमेत फसवणूक केली होती.

हवालामार्फत रक्कम विदेशात

गुंतवणूकदारांची फसवणूक करुन रक्कम हवालामार्फत विदेशात पाठवली. यापूर्वी ईडीने त्यांची दुबईतील ३७ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांची मालमत्तेवर टाच आणली गेली आहे.

काय होती योजना

सर्वसामान्य लोकांना प्रतिमहिना दोन ते तीन टक्के व्याज देऊन गुंतवणुकीचा परतावा देण्याची योजना होती. त्यासाठी विनोद खुटे याने फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली काना कॅपिटल कंपनी बनवली. गुंतवणूकदारांची झूम आणि ऑनलाईन मिटींग घेऊन चांगल्या परताव्याचे आमिष दाखवले. पैसे अनेक बनावट फार्ममध्ये टाकले. हे पैसे हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवले. या योजनेतही गुंतवणूकदारांकडून अनेक कोटींची गुंतवणूक करुन घेतली आहे. ही रक्कम हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली गेली असल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे विनोद खुटे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून ही कारवाई केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.