Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

धुळे :  नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पाच महिलाकडून प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकरांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथे राहत्या घरी केली.


तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होते. त्यामुळे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पौरसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये जमा करुन आणून दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल, असे तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदार यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केली. मात्र, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याचे समजताच पारसकर यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात यांनी घेतले. त्यांच्या विरोधात देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.