Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सोळानंकेच्या पीएला कपडे फाटेपर्यन्त झोडपून रस्त्याने फरफट नेले :, काय आहे प्रकरण?

आमदार सोळानंकेच्या पीएला कपडे फाटेपर्यन्त झोडपून रस्त्याने फरफट नेले :, काय आहे प्रकरण?राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात आणि कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्याबद्दलची खदखद अनेकदा जाहीर बैठकांत कार्यकर्त्यांनी आमदारांच्या कानीही घातली.

पण, दोघांतील नाते घट्टचच आहे. आता पुन्हा एकदा महादेव सोळंके जिल्ह्यात चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसेच आहे. त्यांना भररस्त्यात कपडे फाटेपर्यंत झोडपले. मारहाण करणारा तरुण तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रस्त्याने महादेव सोळंकेला फरफटत ओढत नेले आहे.

पाच महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड, जाळपोळ प्रकरणात विनाकारण माझे नाव का गोवलेस? अशी विचारपूस करत महादेव सोळंके यांना भररस्त्यात तरुणाने बदडले. यावेळी महादेव सोळंके यांना रस्त्याने फरफटत ओढत नेत कपडे फाटेपर्यंत मारहाण होत असताना बघ्याची गर्दी जमली होती.

पाच महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला होता. ऑक्टोबर महिन्यात आरक्षणप्रश्नी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. संभाजी महाराज चौकात आंदोलन केल्यानंतर जमाव आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर चालून गेला. या वेळी जमावाने आमदार सोळंके यांच्या कार्यालयावर तुफान दगडफेक केली, त्यांनतर मोठा जमाव बंगल्यात शिरून कार्यालयातील सामानाची तोडफोड केल

काही जमावाने पार्किंगमध्ये उभा असलेल्या चारचाकी, दुचाकी वाहनांना आग लावली. एवढ्यात काहींनी कार्यालयाच्या पाठीमागेच असलेल्या आमदार सोळंके यांच्या बंगल्यात घुसून आतील सामानाची तोडफोड करत काही खोल्यातील सामानांना आग लावून दरात उभा असलेल्या आमदार सोळंके यांची गाडीही पेटवून दिली होती.

या प्रकरणात तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासून शेकडो तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, या प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादेव सोळंके यांनी आपले मतदारसंघातील जुने हिशेब चुकते करत अनेकांचे नाव या प्रकरणात गोवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. असेच भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय राऊत यांचे नावही या प्रकरणात आल्याने त्यांना अटक व्हावी लागली.

याच रागातून अजय राऊत यांनी माजलगाव शहरातील कायम गजबजलेल्या रंगोली कॉर्नरवर महादेव सोळंकेला गाठले. जाळपोळ प्रकरणात माझे नाव का गोवलेस, असे विचारात अगोदर महादेव सोळंकेच्या तोंडावर फटके मारायला सुरुवात केली. त्यानंतर कॉलर धरून खाली पाडले. पुन्हा कपडे फाटेपर्यंत मारहाण करुन रस्त्यावरून फरफटत ओढत नेले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.