Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अंदाज येताच पोलीस निरीक्षकाने धूम ठोकली

लाचलुचपत विभागाच्या कारवाईचा अंदाज येताच पोलीस निरीक्षकाने धूम ठोकली 


अकोला : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा संशय येताच एक पोलीस अधिकारी थेट लाचेची रक्कम घेऊन चारचाकी वाहने पसार झाला. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हा प्रकार घडलाय. एका प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन आणि त्यांच्या बाजूने चार्जशीट तयार करण्यासाठी अकोट शहर पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस अधिकाऱ्याने तब्बल दीड लाखाची लाच मागितल्याचं हे प्रकरण आहे. तडजोड करून लाचेची रक्कम 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत पोहचली. दरम्यान राहुल देवकर असे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं 'एसीबी'चे अधिकारी मांजरे यांनी 'एबीपी माझा'ला माहिती दिली.



राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याची माहिती 

अवैध सावकारी प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात तक्रारदार पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तक्रारदाराच्या पत्नीला तात्काळ अटकपूर्व जामीन आणि आरोपींच्या बाजूनं चार्जशीट तयार करून तपास सोपा जावा यासाठी एपीआय राहुल देवकर यांनी तब्बल तक्रारदाराला दीड लाखाची मागणी केली होती. तडजोड़ करून लाचेची रक्कम ही 1 लाख 25 हजार रूपयांपर्यत आली. दरम्यान लाच देणं तक्रारदाराला मान्य नसल्यानं त्यांनी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात धाव घेतली, आणि आपली तक्रार नोंदवली. या प्रकरणात सर्व पडताळणी करून लाचखोर एपीआय राहुल देवकर यांनी लाचेची मागणी केल्याच सिद्ध झालं आहे. त्यानुसार आज लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी राहुल देवकर हे अकोट शहरात दाखल झाले आणि तक्रारदाराकडून लाच स्वीकारली खरी. परंतु देवकर यांना एसीबीच्या कारवाईचा संशय आला. त्यानंतर लागलीच त्यांनी लाचेची रक्कम घेत आपल्या खाजगी चारचाकी वाहनानं पळ काढला. 

पोलीस दलात एकच खळबळ उडाली 

दरम्यान 'एसीबी'च्या अधिकाऱ्यांनी राहुल देवकर यांचा दूरपर्यंत पाठलाग केला. परंतू, ते हाती लागले नाहीत. आता या प्रकरणात अकोट शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती एसीबीचे अधिकारी मांजरे यांनी बोलतांना दिली आहे. या घटनेनं अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती एसीबीचे अधिकारी एपीआय राहुल देवकर यांच्या शोधात असून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.