Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत लालू प्रसाद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी 


बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मोठा झटका बसला आहे. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असचाना मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरच्या न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ग्वाल्हेर कोर्टाने शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात हे वॉरंट जारी केले आहे. यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात लालूप्रसाद यांना जोरदार धक्का बसला आहे.

काय आहे प्रकरण -

1995 आणि 1997 मध्ये बनावट फॉर्म क्रमांक 16 तयार करून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे प्रकरण 23 ऑगस्ट 1995 ते 15 मे 1997 या दरम्यानचे आहे.

एकूण तीन कंपन्यांकडून शस्त्रे आणि काडतुसे खरेदी करण्यात आली. या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांच्यासह 23 आरोपींची नावे आहेत. यातील 6 जणांविरुद्ध खटला सुरू आहे, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जण फरार आहेत. पोलिसांनी जुलै 1998 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

अशा परिस्थितीत हे प्रकरण ग्वाल्हेरचे खासदार-आमदार  न्यायालयात आले आहे. कारण लालूप्रसाद यादव  यांचे नाव प्रकरणाशी जोडले गेले आहे. एकूणच लालूप्रसाद यादव यांना निवडणुकीच्या काळात ग्वाल्हेरच्या एमपीएमएलए कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.