Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; गोंदिया हादरलं, घटनेचा

व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; गोंदिया हादरलं, घटनेचा

गोंदिया : गोंदियामधून हादरवणारी घटना समोर आली आहे. रेती व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गोलू तिवारी असं या व्यावसायिकाचं नाव आहे. टीबी टोली ते कुडवा नाका परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान गोलू तिवारी यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचं वातावरण असून, तिवारी यांच्या समर्थकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया शहरातील रिंगरोड स्थित हनुमाननगर येथील रहिवासी गोलू तिवारी यांची रात्री 9 वाजेच्या सुमारास टीबी टोली ते कुडवा नाका परिसरात गोळ्या घालतून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने रेती व्ययसायिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तिवारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

तिवारी यांच्या हत्येच्या घटनेमुळे शहरात मोठा तणाव निर्मण झाला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच तिवारी यांच्या समर्थकांनी ज्या रुग्णालयात तिवारी यांच्यावर उपचार सुरू होते, त्या रुग्णालयात जोरदार राडा करत तोडफोड केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे. दरम्यान तिवारी यांची हत्या नेमकी कोणी केली याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.