Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विदेशात गेलेल्या अभिनेत्रीवर टॉयलेट साफ करण्याची आली वेळ :, शाहरुखच्या अभिनेत्रीची झाली होती बिकट परिस्थिती

विदेशात गेलेल्या अभिनेत्रीवर  टॉयलेट साफ करण्याची आली वेळ :, शाहरुखच्या अभिनेत्रीची झाली होती बिकट परिस्थिती 


कलाविश्वात आज अनेक कलाकार त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि स्टारडममुळे चर्चेत येत असतात. परंतु, यात असेही काही कलाकार आहेत ज्यांनी सुरुवातीच्या काळात अनेक खस्ता खाल्या आहेत. इतकंच नाही तर अगदी हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते रेल्वेमध्ये वस्तू विकण्यापर्यंतही काम त्यांनी केली आहेत.


यामध्ये सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री आज ५८ कोटींची मालकीण आहे. मात्र, एकेकाळी तिने विदेशातील एका मॉलमध्ये चक्क लादी पुसण्याचं काम केलं आहे. सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीये ती अभिनेत्री माहिरा खान हिची. पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या माहिरा खानने अलिकडेच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ती कमालीची चर्चेत येत आहे. यामध्येच एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्ट्रगलवर भाष्य केलं आहे.

माहिराने २००६ मध्ये व्हिडीओ जॉकी म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये ती शाहरुख खानच्या रईस या सिनेमात झळकली. या सिनेमामुळे ती बॉलिवूडमध्ये बरीच लोकप्रिय झाली. आज माहिरा कोट्यवधींची मालकीण आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा ती शिक्षणासाठी विदेशात गेली आणि तिथे गेल्यावर तिच्यावर टॉयलेट साफ करायची वेळ आली.

माहिराने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षी ती कॅलिफोर्निया इथे पुढील शिक्षणासाठी गेली होती. परंतु, इथे तिला खूप स्ट्रगल करावा लागला. त्यामुळे कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन घेऊनदेखील ती पुढील शिक्षण करु शकली नाही. त्यामुळे ती २००८ मध्ये पुन्हा पाकिस्तानमध्ये आली. 

"माझा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. लॉस एंजलिसमध्ये मी टॉयलेट आणि लादी पुसली आहे. सगळे जण मला, तू हंबल आहेस असं म्हणतात. पण, मी माझ्या आयुष्यात खूप कठीण काळाचा सामना केला आहे. मी एका डॉलरमध्ये मिळालेलं जेवण सुद्धा माझ्या भावासोबत वाटून खाल्लं आहे", असं माहिरा म्हणाली.

दरम्यान, माहिराने २०२३ मध्ये बिझनेसमन सलीम करीमसोबत केलं. हे तिचं दुसरं लग्न आहे. या पूर्वी तिने २००७ मध्ये पहिलं लग्न केलं होतं. मात्र, २०१५ मध्ये ती पहिल्या पतीपासून विभक्त झाली. माहिरा यशस्वी अभिनेत्री असून ती ५८ कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. ती एका सिनेमासाठी ३ ते ५ लाख रुपये मानधन घेते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.