Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' ब्ल्यू जावा ' निळ्या रंगाच्या केळीचे दुर्मिळ वाण :, कोठे होते शेती, त्याची वैशिष्टे वाचा....

' ब्ल्यू जावा ' निळ्या रंगाच्या केळीचे दुर्मिळ वाण :, कोठे होते शेती, त्याची वैशिष्टे वाचा....


महाराष्ट्रात शेतकरी प्रामुख्याने पिवळ्या रंगाच्या केळीच्या  मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. विशेष म्हणजे देशभरातील बाजारपेठांमध्ये आपली हीच केळी प्रसिद्ध आहेत. मात्र, अलीकडेच महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाच्या काठावर एका शेतकऱ्याने 'ब्लू जावा' या निळ्या रंगाच्या विदेशी प्रजातीच्या केळीचे उत्पादन घेतले आहे. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वीकडे या केळीची सर्वदूर चर्चा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या केळीबाबत अधिक जाणून घेण्याची इच्छा असलेला एक विशिष्ट शेतकरी वर्ग समाजमाध्यमांवर दिसून आला आहे. आज आपण जागतिक केळी दिवसानिमित्त (17 एप्रिल) केळीच्या 'ब्लू जावा' या दुर्मिळ केळी वाणाबाबत  अधिक माहिती जाणून घेणार आहोत.'ब्लू जावा' प्रजातीची चर्चा केव्हापासून? 
कुठे-कुठे होते शेती?
'ब्लू जावा' वाणाची वैशिष्ट्ये?
'ब्लू जावा' केळीचे फायदे
'ब्लू जावा' प्रजातीची चर्चा केव्हापासून? 

'ब्लू जावा' केळी  वाण हे दुर्मिळ वाण असून, त्याची लागवड अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. अमेरिकेतील ओगिल्वी प्रांतातील फॉर्मर ग्‍लोबल चीफ क्रिएटिव ऑफिसर असेलेल्या एका माजी अधिकाऱ्याने या केळी वाणाचा सर्वप्रथम ट्विटरवर उल्लेख केला. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत कोणी मला 'ब्लू जावा' ही केळी लागवड करण्याबाबत का सुचविले नाही? या प्रजातीच्या केळीची चव ही पूर्णपणे आइसस्क्रीमसारखी आहे. तेव्हापासून हे केळी वाण जगभर प्रसिद्ध झाले असून, ते आता महाराष्ट्राच्या मातीत देखील फुलले आहे.

कुठे-कुठे होते शेती?

'ब्लू जावा' केळी वाणाची लागवड ही प्रामुख्याने दक्षिण-पूर्व अमेरिकी देशांमध्ये पाहायला मिळते. अमेरिकेतील हवाई प्रांतात ही केळी विशेष प्रसिद्ध आहे. या वाणाचे केळी वाण हे 15 ते 20 फुटांपर्यंत वाढते. याशिवाय ही केळी आग्नेय आशियामध्ये देखील आढळतात. या केळी वाणाची निर्मिती ही मुसा बाल्बिसियाना आणि मुसा एक्युमिनाटा या दोन संकरित वाणापासून झाली आहे. या निळ्या केळीमध्ये फायबर, मँगनीज आणि जीवनसत्त्वे B6 आणि जीवनसत्व सी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय काही प्रमाणात लोह, फॉस्फरस, थायामिन आणि सेलेनियम आढळते.

'ब्लू जावा' वाणाची वैशिष्ट्ये?

'ब्लू जावा' वाणाचे फळ हे मध्यम आकाराचे असते. केळीच्या एका फणीत 10 ते 12 फण्या असतात. हे विदेशी वाण इतर स्थानिक वाणाप्रमाणेच दहा महिने कालावधीत काढणीला येते. ब्लू जावा केळीचा गर मलईसारखा असून, त्याची चव आईस्क्रीमसारखी असते. त्यामुळे या वाणाला 'आईस्क्रीम केळी' असे देखील म्हटले जाते.

'ब्लू जावा' केळीचे फायदे

ही केळी उच्च फायबरयुक्त असल्याने नेहमी आहारात असेल तर वजन कमी करण्यात मदत होते. नियमित खाल्ल्याने पचनास मदत होते. ज्यामुळे ही केळी मूळव्याध, पोटातील अल्सर आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग यासह अनेक पाचक विकारांवर रामबाण उपाय ठरते. या वाणाच्या केळीमध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे ही केळी रोग प्रतिबंधात महत्त्वाची भूमिका बजावतात. हृदयरोग, मधुमेह आणि विशिष्ट कर्करोग यांसारख्या तीव्र परिस्थितींपासून संरक्षण करण्यास मदत करतात, असे मानले जाते. ज्यामुळे या वाणाला अधिक दर मिळतो.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.