Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुनीहल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई

खुनीहल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक सांगली शहर पोलिसांची कारवाई 


सांगली :  आईसोबत बॅंकेत पैसे आणण्यास न गेल्याच्या कारणावरून शेजारच्या महिलेवर तलवारीने खुनीहल्ला करणाऱ्या सराईत हद्दपार गुन्हेगारास अटक करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.   सैफ महमूद पटेल (वय २४, रा. खणभाग, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सैफ याच्यावर यापूर्वीच गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

त्यामुळे त्याला सांगली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री तो हद्दपारी आदेशाचा भंग करून सांगली शहरात आला होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणारी महिला रूबिना मुजावर या सैफच्या आईसोबत बॅंकेत पैसे आणण्यासाठी न गेल्याच्या रागातून मुजावर यांच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्यावेळी त्याने हातातील तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. मुजावर यांनी तो हल्ला चुकवला. नंतर त्यांनी याची शहर पोलिसांना माहिती दिली. 


शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच्याकडील तलवार जप्त करून त्याला खुनीहल्लाप्रकरणी तसेच हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक केली. सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद खाडे, विनायक शिंदे, मच्छिंद्र बर्डे, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.