Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅन्सर होण्याआधीच समजेल त्याची माहिती, संशोधकांनी शोधली आहे निदाणाची टेक्निक

कॅन्सर होण्याआधीच समजेल त्याची माहिती, संशोधकांनी शोधली आहे निदाणाची टेक्निक 


कॅन्सर एक भयानक आजार आहे. कॅन्सरची लक्षणे आपल्याला खूप उशीरा समजतात. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरची लक्षणेदेखील वेगवेगळी आहेत. काही वेळा कॅन्सरची लक्षणे हळुहळू सुरु होतात आणि शेवटच्या स्टेजमध्ये आपल्याला त्याविषयीची माहिती समजते.

त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. केंब्रिज युनिव्हर्सिटीचे संशोधक सध्या कॅन्सरवर संशोधन करत आहे. ट्यूमर तयार व्हायच्या काही वर्षे आधी पेशींमध्ये होणारे बदल समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर हे बदल समजले तर कॅन्सरवर उपचारासाठी नव्या पद्धती शोधण्यासाठी याची मदत होईल.

The guardian मधील एका रिपोर्टनुसार, अर्ली कॅन्सर इन्स्टीट्यूट ट्यूमरची लक्षणे दिसायला लागण्याआधीच त्याविषयी जाणून घेता येईल अशी पद्धत शोधत आहे. सध्याच्या काही संशोधनांचा वापर यासाठी केला जाणार आहे. या संशोधनात असे आढळून आले आहे की, अनेक लोकांच्या शरीरात कॅन्सरची गाठ तयार होण्याआधी पेशी निष्क्रिय व्हायला सुरुवात होते. 

अनेकदा उशीरा दिसतात कॅन्सरची लक्षणे

संस्थेच्या संचालिका प्रोफेसर रेबेता फिट्जगेराल्ड यांनी सांगितले की,'' कॅन्सरची गाठ तयार होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो. कधीकधी या गोष्टीसाठी 10-20 वर्षेदेखील लागतात. रुग्णाला अचानक कॅन्सर झाल्याचे समजते. पण डॉक्टरांना याच्याविषयी काही समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. लोकांची मोठ्या प्रमाणात तपासणी करुन कॅन्सरचा धोका आधीच समजून घेता येईल. त्या दृष्टीकोनातून एक रणनीती आखण्याची गरज आहे.

कॅन्सरचे आधीच होऊ शकेल निदान

प्रोफेसर फिट्झगेराल्ड आणि त्यांच्या टीमने एक अशी पद्धत विकसित केली आहे ज्याला सायटोस्पंज (cytosponge)असे म्हटले जाते.एका धाग्याला बांधलेला हा स्पंज असतो. गोळी प्रमाणे हा गिळायचा असतो. पोटात जाऊन तो फुगतो. बाहेर निघताना हा स्पंज esophagus च्या पेशी खेचून घेतो. या पेशींमध्ये TFF3 नावाचे प्रोटीन आढळते. हे प्रोटीन फक्त प्री-कॅन्सर पेशींमध्ये असते. जर हे प्रोटीन आढळले तर रुग्णाला पोटाच्या कॅन्सरचा धोका आहे. त्या रुग्णाची मग जास्त काळजी घेण्याची गरज असते. ही टेस्ट सहज आणि मोठ्या प्रमाणावर करणे शक्य आहे.

प्रोफेसर फिट्जगेराल्ड यांनी या पद्धतीची सध्याच्या कॅन्सर डिटेक्ट करणाऱ्या पद्धतींसोबत तुलना केली आहे. त्या म्हणाल्या की, कॅन्सरचे निदान खूप उशीरा होते. कॅन्सरवरच्या उपचारांसाठी महागडी औषधे खरेदी करावी लागतात. अनेकदा अशा औषधांमुळे रुग्णाचे वय काही आठवडेच वाढते. पण याचा खर्च खूप जास्त असतो. आपल्याला कॅन्सरच्या तपासणीसाठी नवीन दृष्टीकोन समोर ठेवून चालण्याची गरज आहे.

संशोधकांकडे सध्या रक्ताचे साधारण 200,000 नमुने आहेत. या नमुन्यांचा वापर करुन जे संशोधन करण्यात आले त्यात असे आढळले की, ज्या लोकांना 10 किंवा 20 वर्षांनंतर ब्लड कॅन्सर (blood cancer) झाला होता. त्यांच्या रक्तामध्ये आणि कॅन्सर न झालेल्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फरक जाणवला. ल्युकेमियाची लक्षणे (leukemia)समोर येण्याच्या 10 वर्षे आधी व्यक्तीच्या रक्तामध्ये काही अनुवांशिक बदल होतात. या बदलांमुळे कॅन्सर वेळीच रोखण्यासाठी खूप वेळ मिळतो. या काळात उपचार करुन कॅन्सरचा धोका कमी करता येईल.

डॉक्टर आधीच करु शकतील उपचार

कॅन्सरच्या वेगवेगळ्या स्टेजेस असतात.जर वेळीच पेशींमधला बदल समजला तर त्या कॅन्सरच्या पेशींच्या विकासाला थांबवणे शक्य होईल. कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत डॉक्टर आवश्यक पावले उचलू शकतात. नंतरच्या स्टेजेसमध्ये कॅन्सर जास्त पसरण्यापासून थांबवण्यासाठी ते प्रयत्न करु शकतात.

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका

एक टीम प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या पुरुषांवरही संशोधन करत आहे. ब्रिटनमध्ये या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. ज्या लोकांना प्रोस्टेट कॅन्सर होऊ शकतो अशा लोकांविषयी जाणून घेण्यासाठी ही टीम बायोमार्कर विकसित करत आहे. सध्याच्या PSA टेस्टपेक्षा ही टेस्ट जास्त उपयुक्त आहे. कोणत्या लोकांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका आहे,अशा लोकांविषयी जाणून घेण्यासाठी ही टेस्ट वापरता येईल. 

(Diclaimer - हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आरोग्याशी निगडीत कोणत्याही समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.