Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई, सांगली जागेचा विषय संपला!

मुंबई, सांगली जागेचा विषय संपला!


नवी दिल्ली:  राज्यातील काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगली आणि मुंबईतील जागावाटपावरून बिनसले आहे. ठाकरेंनी कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली होती, त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केला होता.

तर मुंबईतील एका जागेवरही काँग्रेसने दावा केला होता तिथेही ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्याने मविआमध्ये नाराजी निर्माण झाली होती. यावर दिल्लीतील इंडिया आघाडीच्या सभेनंतर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे सांगितले जात होते. परंतु दिल्लीत उद्धव ठाकरेंनी आता चर्चा २०२९ लाच असे सांगत राज्यातील काँग्रेस नेत्यांना पुन्हा एकदा धुडकावून लावले आहे.


जागावाटपाबाबत जे काही व्हायचे होते ते होऊन गेले. आता यामध्ये काहीही उरलेले नाही. आता आघाडीमध्ये जागावाटपाची जी चर्चा होईल ती २०२९ ला होणार, असे उद्धव ठाकरे दिल्लीत प्रसारमाध्यमांना म्हणाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून काही वाद नाही. आदा उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर काँग्रेसलाही समजले आहे, असे ठाकरे म्हणाले.

राहुल गांधी किंवा खर्गे यांच्याशी चर्चा करण्याची काही गरज नाहीय. आघाडी-युतीमध्ये शेवटपर्यंत जागावाटपावरून दावे-प्रतिदावे सुरु राहतात. भाजपासोबतही युतीवेळी हे असेच होत होते. ही गोष्ट मविआमध्येही लागू होते, असे ठाकरेंनी काँग्रेसला सुनावले आहे. जागावाटपावरून वाद ही सामान्य गोष्ट आहे. आता दोन- तीन महिन्यांच्या चचर्चानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. यामुळे काँग्रेस नेत्यांना तो स्वीकर करावा असे वाटू लागले आहे, असे ठाकरे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.