Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार

तासगावमधील प्रसिद्ध उद्योजक संभाजी चव्हाण अपघातात ठार 


तासगाव : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील प्रसिद्ध उद्योजक, युएसके ॲग्रोचे संचालक संभाजी चव्हाण (वय ५२) हे शनिवारी दुपारी भीषण अपघातात ठार झाले. जत येथून सिद्धेवाडी या मूळ गावी यात्रेसाठी येत असताना कुंभारवाडीजवळ (ता. कवठेमहांकाळ) त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते जागीच ठार झाले. 

चव्हाण हे व्यावसायिक कामासाठी सकाळी जतला गेले होते. सिद्धेवाडी येथे आज यात्रा असल्याने दुपारी मोटारीतून गावाकडे परतत होते. कुंभारवाडीजवळ आले असता, त्यांचा मोटारीवरील ताबा सुटला. समोरून येणाऱ्या गाडीला जोराची धडक बसली. त्यांच्या मोटारीचेही मोठे नुकसान झाले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

चव्हाण यांनी युएसके ॲग्रो या फर्मच्या माध्यमातून उद्योगामध्ये बस्तान बसविले होते. दर्जेदार कृषी औषधांची उपलब्धता या कंपनीच्या माध्यमातून करायचे. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच तासगाव तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक अपघातस्थळी धावले. कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.