Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापुरात गुटखा तस्करीचा पर्दाफाश, दोघांना अटक

कोल्हापुरात गुटखा तस्करीचा पर्दाफाश, दोघांना अटक


कोल्हापूर : कोल्हापुरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. नाकाबंदीत पोलिसांनी अडवूनही जीप न थांबवता पळून जाणाऱ्या तस्करांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी पहाटे धरारक पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा गुटखा, एक बोलेरो जीप असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.


तौसिफ खुदबुद्दीन शिलेदार (वय २२, रा. रविवारपेठ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर), जावेद मलीक बागवान (वय ३६, रा. लाईन बाजार, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी रात्री नऊ वाजल्यापासून पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली होती. शिवाजी विद्यापीठ ते केएसबीपी परिसरात निरीक्षक तनपुरे यांचे एक पथक गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे एक बोलेरो जीप भरधाव वेगाने जात होती. गस्तीवरील पोलिसांना शंका आल्याने त्यांनी जीप थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र जी न थांबता निघून गेली. त्यावेळी पथकाने जीपचा पाठलाग केला तसेच सायबर चौक येथील नाकाबंदीवरील पोलिसांना जीप अडवण्याच्या सूचना दिल्या.

भरधाव वेगातील जीप (एमएच ०७ पी २९४०) सायबर चौकात थांबवण्यात आली. नंतर पोलिसांनी जीपची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये पांढऱ्या पोत्यांमध्ये गुटख्याच्या पुड्या सापडल्या, त्याबाबत दोघांकडे चौकशी केल्यानंतर हा गुटखा जावेद बागवान याच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुटख्यासह जीप असा दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली.

कोल्हापूर शहरचे पोलिस उपअधीक्षक अजित टिके, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन चंदन, समीर शेख, दीपक येडगे, विराज डांगे, प्रियांका जनवाडे, संदीप सावंत, धनाजी चिरमुरे, सुशांत ठोंबरे आदींच्या पथकाने केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.