Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसहभागाने मतदान टक्केवारी वाढवूया, प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रभक्ती दाखवूया! तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ .

लोकसहभागाने मतदान टक्केवारी वाढवूया, प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रभक्ती दाखवूया! तहसीलदार अपर्णा मोरे -धुमाळ .

मिरज  लोकांच्याच सहभागाने व पुढाकाराने मतदान टक्केवारी वाढवण्यास प्रत्येकाने कर्तव्य भावनेने प्रयत्न करून, शंभर टक्के मतदान करून, राष्ट्रप्रेम सिद्ध करूया! राष्ट्रीय उत्सव साजरा करूया! असे आवाहन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे- धुमाळ यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी तहसीलदार कार्यालय मध्ये विविध सेवाभावी सामाजिक संस्था दिव्यांग देवदासी संस्था प्रतिनिधींच्या व्यापक बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार मोरे धुमाळ होत्या. मतदार जनजागृती संदर्भात प्रशासनाकडून विविध वैशिष्ट्यपूर्ण राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.

उपस्थित प्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेण्यात आली. कमी टक्केवारी मतदान क्षेत्रात विशेष लक्ष देण्याचे ठरले. 18 ते 21 नव मतदारांना प्रोत्साहन देण्याकरिता विविध महाविद्यालय, सर्व धर्मगुरू, शासन पुरस्कार प्राप्त, क्रीडा संस्था, रेशन परवानाधारक, महिला बचत गट यांच्याशी संपर्क साधण्याचे ठरले. तसेच भविष्यात आयोजित संवाद फेरी, मानवी साखळी, घोषवाक्य स्पर्धा ,पोस्टर प्रदर्शन सदर जाणीव जागृती उपक्रमात जनतेने कर्तव्य भावनेने सहभागी व्हावे! असे आवाहन करण्यात आले. यावेळी रेड लाईट एरिया मध्ये मतदार जागृती करिता विशेष पुढाकार घेतल्याबद्दल भीमांगन महिला संस्था व वेशा एड्स मुकाबला परिषद  संस्थांचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला.

प्रास्ताविक नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, स्वागत नायब तहसीलदार आशिष सानप यांनी केले. यावेळी कृषी विस्तार अधिकारी मदन यादव, बचत गट प्रतिनिधी स्मिता शेळके, ब्रह्मकुमारी संस्थेचे बी. डी. पाटील, निसर्ग संवादाचे महेश कुलकर्णी, निरामययोगचे प्रा. राजू देसाई, साहित्यिक दयासागर बने, भूपाळी ते भैरवीचे संपत कदम, कृष्णात पाटोळे, देवदास ट्रस्टचे अनिल मोहिते, इंद्रधनु कलाविष्कार धनंजय जोशी, निवडणूक साक्षरता मंचचे अमन पटेल, महिला समुपदेशन केंद्राचे वंदना लोकरे ज्येष्ठ ागरिक संघ गोडसे, दिव्यांग संघटनेचे यशवंत जाधव, भीमांगन महिला संस्थेचे सुरेखा शेख, आरोग्य हक्क समितीचे प्रमोद माळी, माहेरचे विजय तावरे आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.