Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहाचीं महाराष्ट्रतील सभा तडकाफडकी रद्ध :, मोठं कारण आलं समोर

अमित शहाचीं महाराष्ट्रतील सभा तडकाफडकी रद्ध :, मोठं कारण आलं समोर 


लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा आपल्या मतदारसंघात घेण्यासाठी उमेदवार कामाला लागले आहेत.

भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा शनिवारी (ता. 6) गोंदियात आयोजित केली होती. मात्र, ही सभा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे  यांच्या प्रचारासाठी अमित शाह येणार होते. मात्र, ही सभा रद्द करण्यात आल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. अमित शाह  यांची प्रकृती बिघडली असल्याने ही सभा रद्द केली असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या नियोजन आणि प्रचारामुळे सतत दौरा केल्याने शाह यांना थकवा जाणवत असल्याची चर्चा आहे.

अमित शाह यांची सभा रद्द झाली असली तरी ती सभा पुढील आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 12 किंवा 13 एप्रिलला घेण्याचे नियोजन असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान असल्याने सभांचे नियोजन पक्षांकडून करण्यात येत आहे. स्टार प्रचारकांच्या सभा आपल्या मतदारसंघात व्हाव्यात, यासाठी उमेदवार आपापल्या पक्षांकडे आग्रही असल्याचे दिसून येत आहे. उन्हाचा वाढता पारा बघून सकाळी तसेच संध्याकाळी रॅली, सभा घेण्यास उमेदवार प्राधान्य देत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.