Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अचानक BP हाय होतो? त्वरीत ६ गोष्टी करा; सतत गोळ्या-औषधं घ्यावी लागणार नाही.....

अचानक BP हाय होतो? त्वरीत ६ गोष्टी करा; सतत गोळ्या-औषधं घ्यावी लागणार नाही.....

हायपरटेंशन किंवा उच्च रक्तदाबाची वाढती समस्या विशीनंतर सतावते. ब्लड प्रेशर ९०/१४० च्या वर पोहोचते तेव्हा धमन्यांमध्ये रक्तदाब वाढतो. याचे शिकार फक्त वयस्कर लोकचं नाही तर तरूणसुद्धा होत आहेत. हाय ब्लड प्रेशरची कोणतीही खास लक्षणं नसतात. पण या आजाराला सायलेंट किलरच्या स्वरूपात ओळखलं जातं. हळहळून या आजारानं हृदय आणि किडन्या डॅमेज होतात. यामुळे ब्रेन हॅमरेज, ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकसारख्या जीवघेण्या स्थिती उद्भवतात. हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी लाईफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करणं आवश्यक आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. आज १७ मे वर्ल्ड हायपरटेंशन डे साजरा केला जातो. 

डॉ. कपिल त्यागी यांनी एका हिंदी साईटशी बोलताना बीपी कंट्रोल करण्याचे उपाय  सांगितले आहेत...

मूग डाळीचं सूप...

हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मूंग डाळीचं सूप उत्तम ऑपश्न आहे. हे सूप बनवण्यासाठी सीताफळ, जीरं आणि एक चिमुटभर हळद मिसळा, मूग डाळ ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते. 

मध पाणी...

ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मीठाचं पाणी फायदेशीर ठरतं. एका कपात गरम पाणी घेऊन त्यात १ चमचा मध आणि ५ ते १० थेंब एपल सायडर व्हिनेगर घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

संत्रा रस आणि नारळ पाणी...

जर ब्लड प्रेशर नेहमीच हाय होत असेल तर  एका ग्लास संत्र्याचा रस आणि नारळाचं पाणी मिसळून प्या. दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा अर्धा अर्धा कप पाणी प्या.

काकडी...

काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीचा रायता निरोगी आरोग्यासह रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरते. 

कलिंगड...

डॉक्टरांनी सांगितले की कलिंगडावर एक चिमुटभर वेलची आणि एक चिमुट धणे पावडर घालून खाल्यानं तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पीच फळ (आडू)...

एक कप ताज्या पीचच्या रसात एक चमचा धणे आणि चिमूटभर वेलची पावडर घातल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. दिवसभरात २ ते ३ वेळा या फळांचा रस प्या.

कुमार चोप्रा,

डॉ. सुनील इनामदार,


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.