Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! हेंमत सोरेन अटक प्रकरणी सर्वोच न्यायाल्याची ' 'ईडी'ला नोटीस

Breaking News! हेंमत सोरेन अटक प्रकरणी सर्वोच न्यायाल्याची ' 'ईडी'ला नोटीस 


झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर आज (दि.२९ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. उच्च न्यायालयाने निकाल देण्यास झालेल्या विलंबाविरोधात माजी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. हेमंत सोरेन यांना ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती.


हेमंत सोरेन यांच्या जामिनासंदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाने निकाल देण्यास केलेल्या विलंबाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तसेच, मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या अटकेला आव्हान दिले होते. आज सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांचा खंडपीठासमाेर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ईडीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ६ मे राेजी हाेईल, असे स्‍पष्‍ट केले आहे. झारखंड के पूर्व मुख्यमंत्री हेमंत की जमानत याचिका आज सुप्रीम कोर्टात सुनवाई झाली. या कोर्टाने ईडीची नोंद चालू ठेवली आहे. पूर्व सीएम ने हाई न्यायालयाद्वारे निर्णय सुनाए जाने देरी विरुद्ध शीर्ष न्यायालय का दरवाजा खटखटाया. हेमंत सोरेन को ईडी ने 31 जानेवारी को गिरफ्तार होता.

काय आहे प्रकरण ?

हेमंत सोरेन यांना 31 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. माजी मुख्यमंत्री सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने सोरेन यांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीला आणखी एका आठवड्याची मुदत दिली होती. यापूर्वी 27 एप्रिल रोजी रांची येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. हेमंत सोरेन यांचे काका राम सोरेन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे 13 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. याविराेधात हेमंत साेरेन यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली हाेती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.