Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पती - पत्नीचे 'ते ' CCTV व्हिडिओ पाहून पोलीसानही बसला धक्का :, 30 भयानक कांड उघड

पती - पत्नीचे 'ते ' CCTV व्हिडिओ पाहून पोलीसानही बसला धक्का :, 30 भयानक कांड उघड 


देशाची राजधानी दिल्लीतून एक विचित्र बातमी समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. ही एक अशी घटना आहे ज्यावर सहज विश्वास ठेवणं कठीण आहे. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हे उघड होऊ शकलं. या प्रकरणाचा खुलासा होताच नागरिकांसोबत पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आतापर्यंत डझनभर लोकांना यामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावं लागत होतं. आम्ही बोलत आहोत दिल्लीच्या बंटी आणि बबलीबद्दल.

दिल्ली पोलिसांनी वाहन चोरीच्या 30 गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका जोडप्याला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त विचित्र वीर यांनी सांगितलं की, मनिंदर कौर (23) आणि प्रशांत (25, रा. पहारगंज) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्तांनी सांगितलं की, विकासपुरी पोलीस ठाण्यात 5 एप्रिल रोजी दुचाकी चोरीप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं.

पोलीस उपायुक्त म्हणाले, 'पोलीस पथकाने घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. टीमने महिलेची (कौर) ओळख पटवली आणि तिला पकडलं. त्यांनी सांगितलं की महिलेनं नंतर उघड केलं की तिचा पती प्रशांत देखील चोरीमध्ये सामील होता. पोलिसांनी सांगितलं की, 'चौकशीदरम्यान पोलिसांना समजलं की, या जोडप्याचा यापूर्वीही अशाच प्रकारच्या 30 गुन्ह्यांमध्ये सहभाग होता.' त्यांनी सांगितले की, 30 पैकी 7 गुन्ह्यांमध्ये महिलेचा सहभाग होता आणि तिच्या पतीचा सहभाग 23 प्रकरणांमध्ये होता.

राष्ट्रीय राजधानी दिल्ली हे वाहनांसाठी भारतातील सर्वात असुरक्षित शहर आहे. कारण 2022 पर्यंत देशातील एकूण वाहन चोरीचं प्रमाण 2.5 पट वाढलं आहे. भारतात कारपेक्षा ९.५ पट अधिक सायकली चोरीला गेल्या आहेत. हे निष्कर्ष नुकतेच ECHO च्या एका अहवालात उघड झाले आहेत, ज्यामध्ये 2022 ते 2023 या वर्षात संपूर्ण भारतातील वाहन चोरीचे प्रमाण दुप्पट झाले असल्याचं समोर आलं आहे. या धोकादायक ट्रेंडमध्ये दिल्लीने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.