Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुप्रीम कोर्टाने EVM वर निवडणूक आयोगाला विचारले पाच महत्त्वाचे प्रश्न...

सुप्रीम कोर्टाने EVM वर निवडणूक आयोगाला विचारले पाच महत्त्वाचे प्रश्न...


नवी दिल्ली :  एकीकड़े लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना सुप्रीम कोर्टामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत सुनावणी सुरू आहे. आज कोर्टाने कोर्टान निवडणूक आयोगाला पाच महत्त्वाचे प्रश्न विचारून त्याचे उत्तर मार्गितले आहे.

दुपारी दोन वाजेपर्यंत हे उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत कोर्टात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा वापर आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या मोजणीबाबत कोर्टाकडून महत्त्वाचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.

ईव्हीएममधील प्रत्यक्ष मतदान आणि व्हीव्हीपॅटमधील पावत्यांच्या मोजणी करण्याबाबतच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर कोर्टासमोर एकत्रितपणे सुनावणी सुरू आहे. आज कोर्टाने आयोगाकडे पाच प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

कोर्टाने उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये मायक्रो कंट्रोलर हे उपकरण कंट्रोल युनिटमध्ये असते की व्हीव्हीपॅटमध्ये, मायक्रो कंट्रोलरमध्ये एकदाच सर्व माहिती सेट केली जाते की त्यामध्ये पुन्हा बदल करता येतो, सिम्बॉल लोडिंग युनिट किती आहेत, या प्रश्नांचा समावेश आहे. तसेच मशिनमधील माहिती 30 की 45 दिवस जतन केले जाते आणि ईव्हीएमच्या तिन्ही युनिट एकत्रित सील केल्या जातात की कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट वेगळे ठेवले जाते, असेही प्रश्न कोटोंने उपस्थित केले आहेत.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या याचिकांवर 18 एप्रिल रोजीच सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, आज कोर्टाकडून आणकी काही मुद्द्यावर आयोगाकडून खुलासा मागवण्यात आला आहे. याचिकाकर्त्यांनी मतमोजणी करताना व्हीव्हीपॅटमधील सर्व पावत्या मोजण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने आयोगाने सादर केलेल्या माहितीतील काही मुद्द्यावरून कोर्टाने आणखी माहिती मागवली आहे.

सुनावणीदरम्यान आयोगाने ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करता येत नाही, असा दावा केला आहे. आयोगाकडे 17 लाख व्हीव्हीपॅट मशिन आहेत. चाचणीदरम्यान उमेदवार कोणत्याही मशिनची पडताळणी करू शकतात. तसेच व्हीव्हीपॅटमधील सर्व पावत्यांची मोजणी करायचे असल्यास खूप दिवस लागतील, असेही आयोगाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टा काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.