जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे सोशल मीडिया, गुगल आणि बातमीतून आपल्या पुढ्यात येते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बर्नार्ड अरनॉल्ट आहे. या यादीत मोठा उलटफेर झाला आहे. एलॉन मस्क हा या यादीत किती तरी वर्ष पहिल्या क्रमांकावर होता. पण आता तो यादीत पहिल्या तिघांमध्ये सुद्धा नाही. तिसऱ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग आला आहे. मस्क आता चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर देशातील सर्वात व्यक्ती, उद्योगपती रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी हे आहेत. पण देशातील सर्वात श्रीमंत आयएएस अधिकारी-भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असताना तो केवळ 1 रुपया वेतन घेतो. जाणून घ्या कोट्यवधी संपत्तीचा हा आयएएस अधिकारी आहे तरी कोण?
सर्वाधिक श्रीमंत IAS कोण?
अमित कटारिया हे भारतातील सर्वात श्रीमंत आयएएस पैकी एक आहेत. त्यांची अजून एक खासियत आहेत, ते वेतन म्हणून केवळ 1 रुपया घेतात. त्यांचे कुटुंब गुडगावमधील एका बांधकाम कंपनीचे मालक आहेत. त्यांची पत्नी एक व्यावसायिक वैमानिक आहे. ती भरघोस कमाई करते. त्यांच्याकडे संपत्तीचा डोंगर आहे. पण वेतन एकच रुपया का घेता, याविषयी त्यांनी रोचक उत्तर दिले. या लालफितशाहीत बदल आणण्यासाठीच आपण आयएएस झाल्याचे त्यांनी सांगितले. पैसा कमाविण्यासाठी आपण या क्षेत्रात आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. ते एक इमानदार अधिकारी म्हणून परिचित आहेत.
किती आहे संपत्ती ?
जुलै 2023 पर्यंत कटारिया यांच्याकडे 8.80 कोटी रुपयांची संपत्ती होती. या संपत्तीत त्यांची वार्षिक कमाई 24 लाख आहे. आयएएस अधिकाऱ्यांना टीए, डीए आणि एचआरए सारख्या भत्त्यांना सोडून 56,100 रुपये वेतन प्रति महा पगार मिळतो. एक कॅबिनेट सचिवाला प्रति महा 2,50,000 रुपये वेतन मिळते. काही आयएएस अधिकाऱ्यांना अतिरिक्त मोबदला देण्यात येतो. पदानुसार, जबाबदारीनुसार अतिरिक्त देय कमी जास्त होऊ शकते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.