ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये विविध भत्त्यांचा समावेश असतो. ही मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष घालून दिले आहेत. सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे तसेच कोणती कागदपत्रे, अर्ज कसा करावा याबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?
OBC प्रवर्गातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक समस्या येवू नये यासाठी सरकारच्या वतीने सावित्रीबाई फुले आधार योजना (Savitribai Phule Aadhaar Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, राहणीमान भत्ता, गृहनिर्माण भत्ता अश्या विविध प्रकारच्या भत्यांच्या स्वरुपात 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळामार्फत ही योजना राबवली जाते. ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेवू शकतात. विद्यार्थ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात. या योजनेच्या अर्जाबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र, महाडीबीटी वेबसाईटवर शिष्यवृत्तीसाठीट अर्ज करु शकतात.
योजनेसाठी पात्रता
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असणे गरचेचे आहे. तसेच विद्यार्थी हा ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी पात्र विद्यार्थी हे शैक्षणिक मेरीटनुसार निवडले जातील. विद्यार्थ्यांना दिले जाणारे भत्ते हे विविध प्रदेशांनुसार बदलतात. मुंबई, पुणेसह इतर शहरांसाठी एकूण 60 हजार रुपयांची मदत मिळते. तसेच नगरपालिका क्षेत्रांसाठी एकूण 51,000 रुपयांची मदत व जिल्हा किंवा तालुका स्थानावर विद्यार्थी शिक्षण घेत असल्यास एकूण 43,000 रुपयांची मदत दिली जाते.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आधार कार्ड, ज्या शाळेत, महाविद्यालयात शिकत आहे तेथील नोंदणीचा पुरावा, विद्यार्थी किंवा त्याच्या पालकांचे बँक पासबुक तसेच वार्षिक उत्पन्नाचा पुराव, विद्यार्थ्याच्या 10 वी 12 वी इयत्तेचे प्रमाणपत्र असणे आवशयक आहे.
असा करा अर्ज
योजनेच्या अर्ज प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या योजनेचे अर्जाबाबत तुम्ही महाडीबीटी वेबसाइटवर किंवा इतर मागासवर्गीयांसाठी बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन माहिती जाणून घेवू शकता. अर्ज करण्याआधी योजनेचे तपशील तपासावेत.या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये विविध भत्त्यांचा समावेश असतो. ही मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही पात्रता निकष घालून दिले आहेत. सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी काय पात्रता आवश्यक आहे तसेच कोणती कागदपत्रे, अर्ज कसा करावा याबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.