Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्योजकाकडून लाखोंची लाच घेणारे ठाण्याच्या PSI सह हवालदार अटकेट

उद्योजकाकडून लाखोंची लाच घेणारे ठाण्याच्या PSI सह हवालदार अटकेट 


ठाणे : अ‍ॅल्युमिनियम पट्टयांसह ताब्यात घेतलेला टेम्पो सोडवण्यासाठी सुरुवातीला दोन लाखांच्या लाचेची मागणी व नंतर तडजोडीअंती 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेणारे कळवा पोलीस स्टेशनचे हवालदार माधव दराडे यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावरच एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. दराडे यांना प्रोत्साहन देणारे कळवा पोलीस स्टेशनचे पीएसआय तुषार तानाजी पोतेकर यांनादेखील ठाणे एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात कळवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या घटनेतील तक्रारदारांचा नाशिक येथील वाडीव-हे येथे अ‍ॅल्युमिनियम पट्टी तयार करण्याचा कारखाना आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीतील अ‍ॅल्युमिनियम पट्टयांचा माल मुंबईमध्ये विक्रीसाठी टेम्पोद्वारे पाठवला होता. 16 एप्रिल 2024 रोजी तो टेम्पो भरलेल्या मालासह कळवा पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी पकडला होता. त्यामुळे तक्रारदार हे मालासह टेम्पो सोडवण्यासाठी कळवा पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी हवालदार दराडे यांनी त्यांना भरलेल्या मालासह टेम्पो सोडवण्यासाठी स्वत:सह तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरिक्षक तुषार पोतेकर यांना देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तो माल आणि गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात सडत राहील, अशी धमकी दिली. 24 एप्रिल 2024 पर्यंत दोन लाख रुपये घेऊन येण्यास तक्रारदारास बजावण्यात आले होते.

तक्रादाराने त्याच दिवशी ठाणे एसीबी कार्यालयात जाऊन या प्रकाराबाबत तक्रार दिली. त्या तक्रारीच्या आधारे 24 एप्रिल रोजी ठाणे एसीबीच्या पथकाने पडताळणी अंती पुढील कारवाईला सुरुवात केली. हवालदार दराडे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे तसेच पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांनी दराडे यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. हवालदार दराडे यांना तक्रारदाराकडून पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर 1 लाख 90 हजारांची लाच घेताना एसीबी पथकाने पकडले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पोतेकर यांना देखील ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक राजेश जागडे करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.