आता व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी..तुम्ही जर व्हॉट्सअप वापरत असाल तर तुमचं व्हॉट्सअप कधीही बंद होऊ शकतं. कारण व्हॉट्सअपनेच भारतातून आपली सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय.
पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट
भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. त्यातही व्हॉट्सअप वापरणा-यांची संख्या मोठी आहे. भारतात जवळपास 40 कोटी लोक व्हॉट्सअप वापरतात. मात्र व्हॉट्सअपनं आता भारतातील सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय. एन्क्रिशन तोडण्यासाठी भाग पाडलं तर व्हॉट्सअप भारतातून बाहेर पडेल असा इशारा व्हॉट्सअपची मालकी असलेल्या मेटानं दिलाय.
केंद्र सरकारनं 2021 पासून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी गाईडलाईन्स सुरू केल्या आहेत. त्यानुसार फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अशा मोठ्या प्लॅटफॉर्मसनाही नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली होती. मात्र आमची मेसेजिंग सेवा एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्याचा दावा व्हॉट्सअपने केलाय. इन्क्रिप्टेड याचा अर्थ पाठवलेल्या मेसेजची माहिती केवळ मेसेज पाठवणारा आणि स्वीकारणारा या दोघांमध्येच असते. ग्राहकांच्या प्रायव्हसीचं कारण देत व्हॉट्सअपनं केंद्रांच्या नियमांना कोर्टात आव्हान दिलंय. व्हॉट्सअप विरूद्ध केंद्र सरकार हा वाद कोर्टात पोहचलाय. आता कोर्ट व्हॉट्सअपची मागणी मान्य करतं की व्हॉट्सअप खरोखरच भारतातून आपला गाशा गुंडाळतं हेच पाहावं लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.