Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

10 वर्ष्याच्या अल्पवयीन मुलीवर 6 महिने बलात्कार

10 वर्ष्याच्या अल्पवयीन मुलीवर 6 महिने बलात्कार 


पुणे :- पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ५ वीत शिकणा-या दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिने बलात्कार केला. तसेच कोणाला काही सांगितल्यास मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती.

ही घटना फेब्रुवारी ते जुलै २०२१ दरम्यान घडली होती. या प्रकरणी एका तरुणाला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एस. पी. पोंक्षे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व वेगवेगळ्या कलमान्वये एकुण १७ वर्षे सक्तमजुरी तसेच ६५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत.

या संदर्भात पिडीत मुलीच्या आईने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार अजय किसन शेळके (वय-२६) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी तरुणाने पिडीत मुलीला स्वतः च्या घरी नेऊन वारंवार बलात्कार केला होता. आरोपीला  
१ ) बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोस्को) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप व ३० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद,  
२) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम १० अन्वये सात वर्षे सक्त मजुरी व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद,  
3) बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 13 अन्वये 3 वर्ष सक्त मजुरी व ५ हजार रू दंड, दंड न भरलेस १ महिना साधी कैद  
४) विनयभंग कायदा अन्वये ५ वर्ष सक्त मजुरी व ५ हजार रु दंड, दंड न भरलेस १ महिना साधी कैद,  
५) भारतीय दंड संहिता ५०६ अन्वये २ वर्ष सक्त मजुरी व ५ हजार रु दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. वरील सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगायच्या आहेत. आरोपीने ६५ हजार रुपये दंड भरल्यावर ही रक्कम पिडीतेला देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहेत.
सदर गुन्ह्यात विशेष सत्र न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज रद्द केला होता. या आदेशाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी तक्रार मागे घ्यावी म्हणून आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबावर भरपुर दबाब टाकला होता. ही बाब उच्च न्यायालयाच्या लक्षात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने या खटल्याची तत्काळ दररोज सुनावणी घेण्याबाबत आदेश दिले होते. सदर प्रकरण उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.
दरम्यान, या खटल्याचा एक महिन्याच्या आत निकाल देण्यात आला आहे. गुन्हा शाबीत होऊन आरोपीला कडक शिक्षा लागावी म्हणून सरकारी वकील विद्या विभुते, पौड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक आकाश पवार, सहायक फौजदार विद्याधर निचित, अल्ताफ हवालदार यांनी मेहनत घेतली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.