Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुरीत 11 वर्षाच्या मुलाचा उष्माघताने मृत्यू

राहुरीत 11 वर्षाच्या मुलाचा उष्माघताने मृत्यू 


राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील 11 वर्षीय मुलगा साई गोरक्षनाथ मुसमाडे याचा उष्माघाताने मृत्य झाल्याची घटना रविवार 5 मे रोजी घडली आहे. वाढत्या उन्हामुळे साई याचा बळी गेल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. तांभेरे येथील गोरक्षनाथ मुसमाडे यांचा एकुलता मुलगा साई हा ज्ञानवर्धिनी स्कुलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला उलटी व जुलाब त्रास झाला.त्यानंतर त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्याने साई याला त्रास होऊन मृत्यूचा सामना करावा लागला आहे. साई याच्यावर रविवारी तांभेरे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत साई याच्या मागे आई व वडील असा परिवार आहे. साई मुसमाडे हा मच्छीन्द्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष व संदीप मुसमाडे यांचा चुलत भाऊ होता.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वाढत्या उन्हात घरा बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.