Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केस पातळ होत चालेत? जावेद हबीब सांगतात किचनमधला ' हा ' पदार्थ लावा,15 दिवसात होतील केस दाट

केस पातळ होत चालेत? जावेद हबीब सांगतात किचनमधला ' हा ' पदार्थ लावा,15 दिवसात होतील केस दाट 


केसांची संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हेअर एक्सपर्ट्स जावेद हबीब यांनी एक घरगुती उपाय शेअर केला आहे.  इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत त्यांनी हा उपाय सांगितला आहे. ज्यात ज्यांनी लांब, काळ्या दाट केसांसाठी काही उपाय सांगितले आहेत. आल्याचा हेअर मास्क हा उत्तम उपाय आहे. जावेद हबीब यांनी सांगितलेला उपाय केसांवर कोणत्या पद्धतीने करता येईल समजून घेऊया.


नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार आशियात केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि केस दाट होण्यासाठी पूर्वापार आल्याचा वपर केला जात आहे.  जिंजरॉल हा सर्वात सक्रिय घटक आहे. याचा विविध फार्माकोलॉजिकल आणि माक्रोबायोलॉजिकल प्रभाव आहेत. एका अभ्यासात उंदरांवर आल्याचा कसा परिणाम दिसून येतो ते पाहण्यात आहे. यात केसांच्या वाढीसाठी आलं गुणकारी ठरत असल्याचं दिसून आलं.
आल्याचा हेअर मास्क 

आल्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी १ चमचा आल्याची पावडर घ्या. त्यात ३ चमचे नारळाचे तेल घालून पेस्ट तयार करा. केसांच्या मुळांना १० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यानंतर केस चांगले राहतील आणि केसांचे आरोग्यही खराब होणार नाही. आल्यातील पोषक तत्व स्काल्पमध्ये ब्लड फ्लो वाढवतात. ज्यामुळे केस लांब, दाट आणि चमकदार होण्यास मदत होते. आल्यामुळे केसांतील कोंडा दूर होतो. यातील एंटी फंगल गुण स्काल्प इन्फेक्शनपासून वाचवतात.

नारळाच्या तेलातील गुण
नारळाच्या तेलात एंटी मायकोबियअल आणि एंटी ऑक्सिडेटिव्ह गुण असतात. यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटामीन सी यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे शरीर आतून निरोगी राहण्यास मदत होते. आल्याच्या रसाबरोबर नारळाचे तेल लावल्याने केसांची वाढ चांगली होते आणि केस लांबसडक, दाट होण्यास मदत होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.