Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चप्पल न घालता चालण्याचे फायदे वाचाल तर व्हाल आवक,1 दा ट्राय कराच!

चप्पल न घालता चालण्याचे फायदे वाचाल तर व्हाल आवक,1 दा ट्राय कराच!


सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ट्रेंड फेमस होत असतात. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलॅंडमधील लोक चप्पल न घालता अनवाणी फिरत असल्याची चर्चा होत आहे. हे लोक रस्त्यावर चप्पल न घालता फिरतात आणि ऑफिसमध्येही तसेच जातात.

@CensoredMen नावाच्या ट्विटर अकाउंटवरहा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात लोक चप्पल किंवा शूज न घालता फिरताना दिसत आहेत. असं करणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जात आहे. चला जाणून घेऊ याचे फायदे.


पाय मजबूत होतात

चप्पल किंवा शूज न घालता चालल्याने पायांचे मसल्स आणि लिगामंट्स मजबूत होतात. याने पाठीच्या खालच्या भागाला चांगला सपोर्ट मिळतो. चपप्ल न घालता चालल्याने पाय सामान्य स्थितीत राहतात ज्यामुळे टाचांवर कमी दबाव पडतो. तसेच हिप्स, गुडघे आणि पाठीच्या दुखण्याची समस्या दूर होते.

स्ट्रेस होईल कमी

पायात काहीच न घालता चालल्याने स्ट्रेस कमी होतो. चप्पल न घालता चालल्याने मेंदुर स्टिमुलेटिंग इफेक्ट पडतो ज्यामुळे चिंता आणि स्ट्रेस कमी होतो. 

सेंसरी नर्वस चांगलं होणार

पायात चप्पल किंवा शूज घातले तर पायांचे सेंसरी नर्वस कमी अॅक्टिव राहतात. पण चप्पल न घालता चालेल तर पायांचे सेंसरी नर्वस अॅक्टिव राहतात आणि शरीर जास्त सतर्क राहतं.

चांगली झोप येणार

चप्पल न घालता चालल्यामुळे मेंदुवर पडणारा प्रभाव चांगली झोप येण्यास मदत करतो. चांगली झोप येण्यासाठी खासकरून पायात चप्पल न घालता चालण्याचा सल्ला दिला जातो.

इम्यूनिटी मजबूत होईल

चप्पल न घालता चालल्याने इम्यूनिटी मजबूत होते. असं केल्याने जुन्या वेदनाही दूर होतात. तसेच याने डोळ्यांची दृष्टीही चांगली होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.