Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजप खासदार प्रज्वल रेवण्णाने 400 महिलांचे केले शोषण!महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नीनाही सोडले नाही! 90 जनींचा समावेश

भाजप खासदार प्रज्वल रेवण्णाने 400 महिलांचे केले शोषण!महिला अधिकारी, नेत्यांच्या पत्नीनाही सोडले नाही! 90 जनींचा समावेश 


देशातील निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान दिवेकर यांचा नातू आणि कर्नाटक राज्यातील हसन मतदारसंघाचा खासदार प्रज्वल रेवंडा याच्या लैंगिक शोषणाच्या बातम्यांनी सारा माहोल पलटून गेला. प्रज्वलने तब्बल 400 महिलांचे शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर असून यामध्ये केवळ इतर महिला नसून यात प्रशासकीय क्षेत्रातील महिला अधिकारी आणि स्वतःच्या पक्षातील महिला नेत्यांचाही आणि नेत्यांच्या 90 पत्नींचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

घरातील मोलकरणीपासून सुरू झालेला हा त्याचा घाणेरडा किळसवाणा प्रकार आता 400 महिलांपर्यंत पोहोचला आहे. जेव्हा त्याची काही अश्लील व्हिडिओ काँग्रेसच्या नेत्यापर्यंत पोहोचले होते. तेव्हा गेल्यावर्षी त्याने कोर्टात धाव घेत 21 प्रसारमाध्यमे आणि काँग्रेसच्या नेत्यांविरोधात कोणतेही पुरावे असल्याशिवाय आपल्याविषयी कोणतीही बातमी छापू नये अशा प्रकारचा आदेश त्याने मिळवला होता. या आदेशाच्या जोरावर त्याने एक वर्ष काढले. प्रज्वल रेवणावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असले, तरी गेल्या एक महिन्यापासून भाजपचा हा खासदार देशाबाहेर फरार आहे. 27 एप्रिल रोजी प्रज्वल हा जर्मनीला गेल्याची नोंद परराष्ट्र खात्याकडे झाली. मात्र त्यानंतर तो कुठे आहे हे परराष्ट्र खात्याला ही माहित नाही.

कर्नाटकच्या एसआयटीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आले असून प्रज्वल याने आपल्याच पक्षातील महिला नेत्यांना देखील आपल्या वासनेची शिकार बनवले तसेच कर्नाटकातील प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांना सुद्धा त्याने सोडले नाही स्वतःच त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना वारंवार ब्लॅकमेलिंग केले असे देखील आता समोर आले आहे. विशेष म्हणजे प्रज्वल वयाच्या 17 व्या वर्षापासून हे घाणेरडे कृत्य करत असल्याचे आता समोर आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.