Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मार्केट उघडताच 4.36 लाख कोटींचं नुकसान, मोठी घसरण

मार्केट उघडताच 4.36 लाख कोटींचं नुकसान, मोठी घसरण 


मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज मतदान होत आहे. तर दुसरीकडे आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांना घाम फोडणारी बातमी आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली आहे. गुंतवणुकदारांचे 4.36 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा घाम फुटला आहे. ही रक्कम फक्त शेअर मार्केट उघडताच पहिल्या अर्ध्या तासात नुकसान झालेली आहे. तर एकूण 17 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.


लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि महागाईची आकडेवारी येण्याआधीच्या अस्थिरतेमुळे सोमवारी सकाळी अर्ध्या तासात शेअर बाजार कोसळला. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही 22000 अंकांच्या खाली आल्याने गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं आहे.

टाटा मोटर्स, टाटा स्टील, मारुती, एनटीपीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. या घसरणीमुळे शेअर बाजारातील 17 कोटींहून अधिक गुंतवणूकदारांचे अर्ध्या तासात 4.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

शेअर बाजारात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स 8.43 टक्क्यांच्या घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे, बीपीसीएलच्या शेअर्समध्ये 2.80 टक्क्यांची घसरण झाली. ओएनजीसीचे शेअर्स 2.18 टक्क्यांच्या घसरण झाली. हिरो मोटर्स आणि कोल इंडियाचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1.30 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत. एसबीआयचे शेअर दीड टक्क्यांहून अधिक घसरले.

शेअर बाजारातील घसरणीमुळे अवघ्या अर्ध्या तासात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. आकडेवारीनुसार, सकाळी 9.45 वाजता बीएसईचे मार्केट कॅप 3,92,19,774.29 लाख कोटी रुपये झाले होते. तर शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर बीएसईचे मार्केट कॅप 3,96,56,440.83 लाख कोटी रुपये होते. याचा अर्थ गुंतवणूकदारांचे 4.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.