🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्यूज! कोल्हापूर - बस्तवडे येथील वेदगंगापूर नदीत 4 जणं बुडाले

ब्रेकिंग न्यूज! कोल्हापूर - बस्तवडे येथील वेदगंगापूर नदीत 4 जणं बुडाले 


कागल तालुक्यातील बस्तवडे बंधारा येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१७) दुपारी घडली आहे. तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, तर एकाचा शोध सुरू आहे.

ग्रामस्थांनी दोन महिलांसह तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आणुर गावाच्या यात्रेसाठी पाहुण्यांच्या घरी आलेले नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्यानंतर चौघांचा बुडून मृत्यू झाला.

जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) अशी बुडालेल्यांची नावे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.