Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कपड्यात, अंथरुणात ढेकून झालेत? 'या ' 5 ट्रिक्स, 5 मिनिटात ढेकून गायब

कपड्यात, अंथरुणात ढेकून झालेत? 'या ' 5 ट्रिक्स, 5 मिनिटात ढेकून गायब 


घरात ढेकूण शिरले तर ते गाद्या फर्निचरसह इतर घरगुती वस्तूंमध्ये दिसून येतात. ढेकूणांमुळे फक्त घर खराब होत नाही तर आरोग्याच्या समस्याही उद्भवतात. खाज येणं, एलर्जी झोप यायला त्रास होणं अशा समस्या उद्भवतात.  बेड बग्स म्हणजेच ढेकूणांपासून सुटका मिळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. ज्यामुळे ढेकूण अगदी सहज दूर होतील. एकदा घरात ढेकूण झाले तर दिवसेंदिवस ते अधिकच वाढत जातात. 


ढेकूणांपासून सुटका मिळवण्यासाठी बेडची चांगली सफाई करणं गरजेचं आहे. बेडवरील चादरी, उशांचे कव्हर आणि अन्य वस्तू गरम पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर हाय टेम्परेचरवर ड्रायरमध्ये सुकवा. गादी, सोफा अन्य फर्निचर वॅक्यूम क्लिनरने व्यवस्थित साफ करून घ्या. वॅक्यूम बॅग त्वरीत बाहेर फेका जेणेकरून ढेकूण पुन्हा येणार नाहीत.

१) स्टिम क्लिनिंग

स्टिम क्लिनिंग ढेकणांना मारण्याचा एक प्रभावी उपाय आहे. ढेकूण आणि त्यांचे अंडे उच्च तापमानात जिवंत राहू शकत नाहीत. अशावेळी स्टिम क्लिनरचा उपयोग करा. गादी, सोफा, कालीन, अन्य प्रभावित भागांवर स्टिम क्लिनर चालवा. या उपायाने ढेकूण आणि त्यांची अंडी मरण्यास मदत होईल.
2) कडुलिंबाचे तेल आणि लेव्हेंडर ढेकूणांना दूर पळवण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे. कडुलिंबाचे तेल ढेकूणांना मारण्यास सक्षम असते. लेव्हेंडर तेल याची संवेदनशीलता कमी करते. या तेलाला पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि प्रभावित क्षेत्रांवर स्प्रे करा. या उपायाने ढेकूण दूर होतील आणि घर ताजतवानं राहील.

३) डायटोमेयस अर्थ

डायटोमेयस अर्थ एक नॅच्युरल पावडर आहे. ज्यामुळे ढेकूण किंवा इतर किटक दूर होतात. ही पावडर ढेकूणांच्या एक्सोस्केलेटनला नष्ट करते. ज्यामुळे ते हिडायड्रेट होतात आणि मरतात. ही पावडर गादी अन्य प्रभावित क्षेत्रांवर लावा त्यानंतर वॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.

४) प्रोफेशन्सची मदत घ्या
जर घरगुती उपायांनी ढेकूणांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर प्रोफेशन्सची मदत घेऊन पेस्ट कंट्रोल करा. एक्सपर्ट्सद्वारे खास रसायने आणि टेक्निक्सचा उपयोग करून तुम्ही ढेकणांना पूर्णपणे नष्ट करू शकता. हा उपाय सर्वात जास्त असरदार असतो ज्यामुळे ढेकणांवर नियंत्रण मिळवता येते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.