Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लॉनमालकाकडून 5 हजारांची लाच घेतांना पीएसआयला अटक

लॉनमालकाकडून 5 हजारांची लाच घेतांना पीएसआयला अटक 


नागपूर : लॉनमध्ये लेटनाईट कार्यक्रम सुरू असल्याने कारवाई न करण्यासाठी लॉनमालकाकडून पाच हजारांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. संबंधित उपनिरीक्षक राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यातील आहे.
महेश किसन निकम (प्रगतीनगर, जयताळा) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तो मुळचा जळगावमधील पावडा तालुक्यातील आहे. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक लॉन असून बऱ्याच ठिकाणी परवानगीशिवाय लेटनाईट कार्यक्रम चालतात. त्यामुळे नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो. महेश निकमने एका लॉनमालकाला कारवाई न करण्यासाठी दर महिन्याला पाच हजारांची मागणी केली होती. त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने मालकाने थेट एसीबीशी संपर्क केला. 

तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी लाच घेताना निकमला रंगेहाथ पकडण्यात आले. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे, प्रिती शेंडे, भरत ठाकूर, भागवत वानखेडे, उपेंद्र आकोटकर, हेमराज गांजरे, दिपाली भगत, प्रिया नेवारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.