Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' माझी बायको झालीस तर महिन्याला 5 हजार देईन ', सासऱ्याची सुनेकडे विचित्र मागणी, मग....

' माझी बायको झालीस तर महिन्याला 5 हजार देईन ', सासऱ्याची सुनेकडे विचित्र मागणी, मग....


लखनऊ : एक अतिशय धक्कादायक आणि हैराण करणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. ज्यात आपल्या सासऱ्याच्या कृत्यांना कंटाळून एका सूनेनं थेट पोलीस ठाणं गाठलं. सूनेचा आरोप आहे, की सासरा तिला म्हणतो, माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला 5 हजार रूपये देईल. इतकंच नाही तर ती कुठे आली-गेली तर तिचा पाठलागही करतो. पोलिसांनी आरोपी सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या बांदा येथून समोर आली आहे.

हे प्रकरण बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथे राहणाऱ्या एका महिलेने पोलीस ठाण्यात फिर्यादीदरम्यान सांगितलं की, माझे सासरे माझा विनयभंग करतात. याशिवाय मी पत्नी म्हणून राहिले तर दरमहा पाच हजार देईन, असं ते म्हणतात. मी कुठेही जाते, तेव्हा ते माझा पाठलाग करतात. जेव्हा मी माझ्या पती आणि सासूकडे याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनीही मदत केली नाही. पती बाहेर मजुरीचे काम करतो.
सासरच्या मंडळींना वैतागून ती महिला आई-वडिलांच्या घरी आली. तर सासऱ्याने तिला धमकी दिली की, इथे आल्यास पत्नी म्हणून राहा, अन्यथा जीवे मारेन. नवराही वडिलांच्या बाजूने आहे. पीडित महिलेनं पोलिसात तक्रार करत आरोपी सासऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी बिसंडा पोलीस स्टेशनचे एसएचओ श्यामबाबू शुक्ला यांनी सांगितलं की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. तक्रारीच्या आधारे सासऱ्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून, जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.