Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल :-जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा

6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल :-जरांगे पाटीलांचा सरकारला इशारा 


चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील  यांनी सरकारला दिला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. 

चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार

मनोज जरांगे पाटील  म्हणाले, 21 ते 24 तारखेपर्यंत दौरा आहे. त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे. चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे. आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण आमचे लोकं मोठे झाले तर त्यांचा कल्याण होईल. त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतरवालीत एकवठणार आहोत.

सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, हैदराबादचा गॅझेट लागू कमराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. हैदराबादचा गॅझेट लागू करावा, याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल. ठरल्याप्रमाणे आम्हाला 6 जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल, असंही मनोज जरांगे पाटील  म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत जरांगेमुळे फायदा झाल्याचा ठाकरेंच्या उमेदवाराचा दावा 

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगेंचा  फायदा मला व बीडमधील बजरंग सोनवणेंना झाला, अशी जाहीर कबुली परभणीचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव  यांनी रविवारी दिला होती. कालपर्यंत वेगळी होणारी निवडणूक एकदम जातीवर गेली. त्याचा दगाफटका भविष्यात काय काय होईल हे आत्ताच सांगू शकत नाही. पण, दोन समजात वितुष्ट निर्माण झालंय ही वस्तूस्थिती आहे. जे पेरलं तेच उगवणार, ज्या पद्धतीने लोकांनी महादेव जानकरांचा प्रचार केला, त्याची रिएक्शन मराठा समाजात उमटली . त्यामुळे मराठा समाज एकटवून माझ्या पाठिशी उभा राहिला. हे मी मानणारा आहे, असंही बंडू जाधव  यांनी म्हटलं होतं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.