Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बायको नांदायाला येत नाही, पुण्यात 7 ठिकांनी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

बायको नांदायाला येत नाही, पुण्यात 7 ठिकांनी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी 


पुण्यात कोण काय करेल याचा नेम नाही. बायको नांदायला येत नसल्याने संतापलेल्या एका पतीने थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुने  फोन करुन शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. लोकसभा निवडणुकीचे मतदान  सुरु असताना मिळालेल्या या धमकीमुळे पुणे पोलिसांना धक्का बसला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
पुणे शहरामध्ये मागिल काही दिवसांपासून गुन्ह्यंमध्ये वाढ होत आहे. शहरात वाहनांची तोडफोड करुन हवेत कोयते नाचवून दहशत पसरवण्याच्या घटना घडत आहेत. असे असताना गोळीबाराच्या घटना मागील महिन्यात चार वेळा घडल्या आहेत. गुन्हेगारांप्रमाणे कौटुंबिक वाद आणि कलह देखील समोर येत आहे. किरकोळ कारणावरुन कुटुंबात वाद होतात. काही दिवसांपूर्वी एका कुटुंबामध्ये चिकनवरुन वाद झाला. त्यानंतर आईने व मुलांनी मिळून बापाला बेदम चोप दिला. आता देखील पत्नी सोबत झालेल्या भांडणातून शहराला वेठीस धण्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तीने पत्नीचा राग काढण्यासाठी पुणे शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिली आहे.पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन आला. बायको नांदण्यासाठी परत नाही आली तर पुण्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी त्या फोनमधून देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने पुणे शहरात सात ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली.  पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला हा फोन आल्याने एकच खळबळ उडाली.  पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरु केली.  पुणे पोलीस लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या बंदोबस्तात व्यस्त असताना हा धमकीचा फोन आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.