Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कूलरचा शॉक लागून 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू

कूलरचा शॉक लागून 7 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू 


अकोला : आपण कुलरमध्ये पाणी भरताय? अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावताय? तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात  कुलरच्या  विजेचा धक्का लागून एका 7 वर्षीय चिमुकलीला जिव गमवावा लागला घरात लावलेल्या कूलरजवळ खेळत असताना, या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्ती अमोल गोगे असं या मरण पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे. काल, रविवारच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी  आकस्मित मृत्यूची नोंद केलीय. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.


कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. दरम्यान, कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्तीचे आईवडील आणि कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा मृत्यू झाला होता. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता. त्यातूनच ही दुर्घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांपूर्वीचं कुलरमुळे पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वीचं पाणी भरतांना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने (57, रा. अंबिका नगर, मलकापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पुन्हा कूलरचा शॉक लागून मृत्यु झाल्याची अकोल्यातील ही दूसरी घटना आहे.

अकोल्यात उष्णतेचा पारा 44.4 सेल्सिअसवर

मागील दोन ते तीन दिवसात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहे. अशातच काल विदर्भातील अकोला  जिल्ह्याचे तापमान हे सर्वाधिक 44.4° सेल्सिअसवर गेल्याचे बघायला मिळाले आहे. या वर्षातील हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आज बुलढाणा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्याचे कमाल तापमान 40° सेल्सिअसवर नोंदविण्यात आले आहे. तर आगामी काही दिवसात कमाल तापमानात आणखी वाढ होणार असून विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा  इशाराही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी घरातच राहण्यास पसंती दिली आहे. असे असले तरी कूलरमध्ये पाणी भरत असताना अथवा कुलर सुरू असताना विद्युत प्रवाह आणि बाबी तपासून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.