Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्र्याच्या नाशकात 800 कोटींचा घोटाळा, चोकशी करण्याची राऊतांची फडणवीसांकडे मागणी

मुख्यमंत्र्याच्या नाशकात 800 कोटींचा घोटाळा, चोकशी करण्याची राऊतांची फडणवीसांकडे मागणी 


मुंबई : राज्यातील चौथ्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी प्रचार होत आहे. अशातच नाशिक महानगरपालिकेत ८०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय.


याच पार्श्वभूमीवर राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. राऊतांनी पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमितीन ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेऊन त्यांनाच सातशे कोटी रूपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आलाय. यामुळेच मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी टाळून संबंधित बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील राऊतांनी केलाय.

हा घोटाळा करतांना तत्कालीन महापालिका आयुक्तांनी स्वत: च्या मर्जीतील अधिकाऱ्यांची प्राधान्यक्रम समिती निर्माण केली. महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगमनताने सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून ठारवीक बिल्डरांच्या फायद्यांसाठी महापालिकेची तिजोरी लुटलीय. बिल्डरांनी आर्थिक फायदा घेताना मुद्रांक शुल्क, आयकर, नजराणा मोठ्या प्रमाणात बुडवून शासनाच कोट्यवधी रूपयांचे नुकसान केले आहे. मोबादला देण्याची आवश्यकता नसलेल्या अनेक जागांसाठी नियमबाह्यपणे कोट्यवधी रूपयांचा मोबदला दिला गेला असल्याचेही राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, या घोटाळ्याचा सविस्तर अहवाल व पुरावे फाईलमध्ये जोडले आहे. या संपुर्ण घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच एसआयटी, ईडी, सीबीआय, एसीबीमार्फतही चौकशी व्हावी. नजराणा, आयकर,मुद्रांक शुल्क वसूल करण्यासाठी संबंधित खात्यांना निर्देशित करावे. व सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राऊतांनी केलीय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.