Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

84 वर्षांचे आजोबा तिसऱ्यांदा बोहल्यावर :, आजीबाईचाहीं आनंद गगनात मावेना

84 वर्षांचे आजोबा तिसऱ्यांदा बोहल्यावर :, आजीबाईचाहीं आनंद गगनात मावेना 


अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील चिंचोली रहिमापूर गावात असं एक लग्न पार पडलं, ज्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. लग्न करणं हे आपल्याकडे पवित्र बंधन मानलं जातं. एक लग्न करून आपल्या जोडीदारासोबत आयुष्य घालविण्याचा निर्णय अनेक जोडपी घेतात.

पण काहीजणांचे साथीदार आपल्या जोडीदाराला सोडून जातात मात्र,काहीजणांना एकापेक्षा अनेक लग्नावर विश्वास असतो. अशावेळी ते आपलं वय देखील पाहत नाहीत. अशीच एक घटना अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर येथे घडली आहे.


येथील कुटुंब प्रमुख विठ्ठल खंडारे यांनी वयाच्या ८४ वर्षी एका ६५ वर्षीय आजीबाई सोबत तिसरं लग्न केलं आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील चिंचोली रहिमापूर राहणाऱ्या या व्यक्तीने ८४ वयात तिसऱ्यांदा लग्न केले आहे. हा विवाह करण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील मुलगा सून नातवंडांनी संमती दिली होती.

आता या वयस्कर माणसाच्या या करारनाम्यामुळे आता या कुटुंबांची खूप चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात होत आहेत. विठ्ठल खंडारे असे या ८४ वर्षीय आजोबांचे नाव आहे. विठ्ठलरावाच्या पत्नीचे तीन ते चार वर्षांपूर्वी देवाज्ञा झाली त्यामुळे विठ्ठल रावांना जो मायेचा आधार पत्नी पासून मिळत होता तो कमी झाल्याने आपण दुसरा विवाह करतो असा माणस त्यांनी मुलानजवळ बोलून दाखवला होता.

परंतू याला कुटुंबातील मंडळीने विरोध केला. शेवटी वडीलांच्या अति आग्रहास्त त्यांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी मुलगा सूनेने होकार दिला. आणि अकोट येथील ६५ वर्षीय महीलेशी चिंचोली रहिमापूर येथे विधीवत विवाह पार पडला असुन या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या मुलामुलीसह नातवंडांनी आनंद घेत ठेका धरला. या विवाह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या विवाहाची चर्चा संपुर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून प्रेमाला वयाचे बंधन नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.