Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एका व्यक्तीकडून 8 वेळा मतदान? व्हायरल व्हिडिओवर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप :, म्हणाले " अधिकाऱ्यानो लक्षात ठेवा "

एका व्यक्तीकडून 8 वेळा मतदान? व्हायरल व्हिडिओवर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप :, म्हणाले " अधिकाऱ्यानो लक्षात ठेवा "


एका तरुणाने चक्क आठवेळा मतदान केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राजकीय प्रतिक्रियाही उमटताना दिसून येत आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांनीही या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन आपली जबाबदारी विसरू नये, अन्यथा इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलेल्या एका पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक तरुण आठ वेळा मतदान करत असल्याचा एक व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केला होता. तसेच निवडणूक आयोगाला असे वाटत असेल की हे चुकीचं आहे, तर त्यांनी कारवाई करावी, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती. याबरोबरच ही भाजपाची बूथ कमेटी नसून लूट कमेटी आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. यादव यांच्या या पोस्टला रिपोस्ट करत राहुल गांधी यांनी निवडणूक अधिकारी आणि सत्ताधारी भाजपाला लक्ष्य केलं.

काय म्हणाले राहुल गांधी?
आपला पराभव समोर दिसू लागल्याने भाजपाला सरकारी यंत्रणेवर दबाव आणून लोकशाही धोक्यात आणायची आहे. अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच निवडणुकीचे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडून घटनात्मक जबाबदारी विसरू नये, अन्यथा अन्यथा, इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांच्यावर अशी कारवाई करण्यात येईल, की भविष्यात कोणीही 'संविधानाच्या शपथेचा' अवमान करण्यापूर्वी १० वेळा विचार करेल, असा इशाराही त्यांनी दिली.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रविवारी दोन मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओ एक तरुण भाजपाचे उमेदवार मुकेश राजपुत यांना चक्क आठ वेळा मतदान करताना दिसत होता. या व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नसली तरी हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितलं जात आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांकडून तरुणाला अटक

दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली असून या तरुणाला अटक करण्यात आली आहे. राजन सिंग असं या तरुणाचे नाव आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.