Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या मुसलमांबद्धलच्या ' त्या ' विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर :, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदिंच्या मुसलमांबद्धलच्या ' त्या ' विधानावर भाजपातील नेत्याचाच घरचा आहेर :, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?


राजस्थान पोलिसांनी शनिवारी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचा माजी नेते उस्मान गनी यांना अटक केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला गनी यांची भाजपातून हकालपट्टी करण्यात आली होती. बिकानेरमधील पोलीस ठाण्यात गोंधळ घालणे आणि शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली गनी यांच्यावर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रतिबंधात्मक अटक तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. गनी यांनी अलीकडेच राजस्थानच्या बांसवाडा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीसंदर्भात भाष्य केले होते, त्यानंतर अनेकांनी त्याच्या ठळक मथळ्यासह बातम्या केल्या. भाजपाने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी गनी यांची हकालपट्टी केली.

नवी दिल्लीतील एका दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीशी बोलताना गनी म्हणाले की, जनतेची संपत्ती हिसकावून मुस्लिमांना वाटली जात असल्याच्या मोदींच्या वक्तव्यामुळे मी निराश झालो आहे. जेव्हा मी भाजपाचा सदस्य म्हणून मुस्लिमांची मते मागायला जातो, तेव्हा ते मला पंतप्रधानांच्या टिप्पणीबद्दल विचारतात. मला लाज वाटते. मी मोदींना पत्र लिहून असे बोलू नका अशी विनंती करणार आहे. बिकानेर अल्पसंख्याक सेलमधील काही भाजपा नेत्यांनीही गनी यांचं कौतुक केलं आहे. गनी यांनी पक्षासाठी नेहमीच कष्ट घेतले, त्यामुळेच मी भाजपाकडे आकर्षित झालो आहे. माझ्यावर आधीच भाजपाचा प्रभाव होता. अल्पसंख्याक सेलमध्ये अनेक नेते आहेत, पण इथे गनीइतके कष्ट करणारा कोणीही नेता नाही," असंही पक्षाच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुका तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चांगले काम केले होते.

प्रत्येक जण त्यांना ओळखतो. ते पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा चेहरा होते आणि बिकानेरच्या बाहेरही सभांना हजेरी लावत होते," असेही भाजपा नेते सांगतात. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धी कुमारी यांच्यासाठी बिकानेर पूर्व मतदारसंघात संयुक्तपणे प्रचार केला होता. गनी मूळचे बीकानेरचे असून, ते काही काळ पक्षात होते. त्यांनी १५-२० वर्षे संघात काम केल्याचा दावा केला होता. आधी ते अभाविप आणि नंतर भाजपामध्ये आले, असंही भाजपा अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमजान अली सांगतात.

गनी केवळ सात ते आठ वर्षे पक्षात होते. ते पूर्वी अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गेली तीन वर्षे जिल्हाध्यक्ष होते," असेही अली म्हणालेत. गनी यांच्यावर भाजपाने योग्य कारवाई केली आहे. ते पक्षाशी एकनिष्ठ नसल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षात असताना तुम्ही पक्षाच्या विरोधात कसे बोलू शकता? मी गेली ४० वर्षे पक्षात आहे. काल पक्षात आलेले लोक मोदींबद्दल वाईट बोलत आहेत. गनी यांची काँग्रेसनं दिशाभूल केल्याचंही ते म्हणालेत. "भाजपाने त्यांना आदर, सन्मान आणि प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या भावाला तिकीट दिले. लोक त्यांना पक्षामुळे ओळखतात," असेही अली सांगतात. गनी यांना ताब्यात घेण्याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गनी यांचा भाऊ मोईन खान याने २०१४ मध्ये बिकानेरमधील वॉर्ड क्रमांक ५५ मधून कौन्सिलरची निवडणूक लढवली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता. बिकानेर पोलिसांनी शनिवारी गनीला ताब्यात घेतल्याचे जाहीर केले. राजस्थानच्या बांसवाडा येथील एका सभेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती.

न्यूज २४ शी बोलताना गनी म्हणाले की, मुस्लिम असल्याने पंतप्रधान जे बोलले ते पाहून मी निराश झालो आणि भाजपासाठी मते मागण्यासाठी ज्या मुस्लिमांना भेटलो, ते मोदींच्या वक्तव्यावर मला प्रश्न विचारत होते. त्यानंतर लगेचच गनी यांची भाजपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली. मुक्ता प्रसाद नगर पोलीस ठाण्याचे एसएचओ धीरेंद्र शेखावत यांनी सांगितले की, गनी शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचे वाहन त्यांच्या परिसरात पाठवल्याबद्दल आक्षेप घेतला होता. दिल्लीत असलेले गनी बिकानेरला परतल्यावर पोलीस ठाण्यात आले. “त्यांनी आम्हाला विचारले की, आम्ही त्यांच्या घरी पोलिसांची गाडी पाठवण्याची हिंमत कशी केली, त्यानंतर गनी यांची पोलिसांशी बाचाबाची झाली. ते एक अतिशय साधी व्यक्ती आहेत आणि अशा गोष्टींपासून दूर असतात, असंही अल्पसंख्याक सेलच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली, असेही गनीचे समर्थक सांगतात.

गनी यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) सदस्य होते. २००५ मध्ये ते भाजपामध्ये सामील झाले आणि त्यांची हकालपट्टी होण्यापूर्वी त्यांनी पक्षाचे बिकानेर जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा प्रमुख म्हणून काम पाहिले होते. एका तक्रारीच्या संदर्भात ते शनिवारी शहरातील मुक्ता प्रसाद नगर पोलीस ठाण्यात गेले, त्यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. गनीने पोलिसांशी भांडण केल्यानंतर त्यांना सीआरपीसीच्या कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करूनही ते मागे हटले नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. भाजपाचे राज्य अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष हमीद खान मेवाती म्हणाले की, गनी यांनी त्यांच्या नाराजीचा मुद्दा योग्य मंचावर मांडायला हवा होता. पक्षाचे पदाधिकारी असूनही त्यांनी चुकीच्या व्यासपीठावर एका विशिष्ट मुद्द्यावर आपला असंतोष बोलून दाखवला. भाजपाच्या राजवटीत मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजनांचा त्यांना फायदा होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.