सांगली : जाळ्या व किडे असलेले बाळवाटी देऊन ग्राहकाला सदोष सेवा दिल्याबद्दल दुकानदाराने ५५ हजार रुपये ग्राहकाला भरपाई म्हणून देण्याचे आदेश सांगली येथील ग्राहक न्यायालयाने दिले आहेत. न्यायाधीश प्रमोद गो.गिरी गोस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील श्रीमती मनीषा वनकोरे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. बाळकुटीचे ४० रुपये, नुकसान भरपाई म्हणून ५० हजार रुपये व अर्जाचा खर्च म्हणून ५ हजार रुपये असे मिळून ५५ हजार ४० रुपये ३० दिवसात दांडेकर कंपनीने सुनील तोरणे यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सुनील राजेंद्र तोरणे (रा. नवीन कोर्टाच्या मागे, विजयनगर) यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या मुली करिता दांडेकर अँड कंपनी शाखा विश्रामबाग येथून २२ ऑक्टोबर २०२९ रोजी २०० ग्रॅम बाळवाटीचे पॅकेट खरेदी केली होते. त्या पॅकेटची काल वैद्यता ९० दिवसाची होती. तोरणे यांनी २७ नोव्हेंबर २०१९ रोजी ते पॅकेट उघडले असता त्या पॅकेटमध्ये जाळ्या व किडे त्यांना आढळून आले.त्यांनी याबाबत दांडेकर कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यांनी तोरणे यांनी ॲड. स्वाती गौड व ॲड. एस. जी. कांबळे यांच्या वतीने सांगली येथील ग्राहक न्यायालयामध्ये दांडेकर अँड कंपनी गावभाग सांगली तर्फे ओंकार दांडेकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली. दांडेकर कंपनीने सदोष सेवा दिल्याचे न्यायालयात शाबीत झाल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.