Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लहान मुलांच्या हातात मोबाईल कधी द्यावा? बिल गेट्स यांनी दिला सल्ला

लहान मुलांच्या हातात मोबाईल कधी द्यावा? बिल गेट्स यांनी दिला सल्ला 


लहान मुलं ही आता मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्स वापरताना दिसत आहेत. त्यातून अनेक मुलं ही स्मार्टफोन्सच्या आहारीही जात आहेत. अशा परिस्थितीत मुलांकडून पालक फोन काढून घेतात. परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की आता लहान मुलांचे शिक्षणही मोबाईल फोन्सवरच होते आहे. 17 ते 20 वर्षांपर्यंतची मुलं ही सोशल मीडियावर जास्त वेळ असतात. त्यामुळे त्यांचा स्क्रिन टाईमही फार वाढलेला दिसतो आहे. अशावेळी त्यांच्या मनावरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सोशल मीडियावरील अनेक गोष्टी त्यांना आकर्षित करत असतात. त्यामुळे अशावेळी त्यांचे अभ्यासावरील लक्ष, त्यांची एकाग्रता दूर होऊ शकते. यासाठी पालकांना योग्य तो इलाज करावा लागतो. 


यावेळी प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनीही सल्ला दिला आहे. बिल गेस्ट्स हे लोकप्रिय उद्योजक आहेत. त्यांचे नाव हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैंकी एक आहे. ते अनेकजणांना प्रेरणा देतात. मुलांच्या हातात कधी फोन द्यावा यासाठी बिल गेस्ट्स यांनीही आपले मत मांडले आहे. 'द मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी लहान मुलांनी कोणत्या वयात मोबाईल फोन बाळगावा, हे सांगितले आहे. 
बिल गेट्स यांनी सांगितले की, त्यांनी त्यांचया मुलांना वयाच्या 14 व्या वर्षांपर्यंत मोबाईल फोन स्वत: कडे बाळगण्याची परवानगी दिली नाही. त्यांनी सांगितले की, ते स्वत: त्यांच्या मुलांचा स्क्रीन टाईम किती असावा हे ठरवायचे आणि होमवर्कसाठीही किती वेळ द्यावा हेही ठरवायचे. त्यामुळे अशावेळी त्यांनी असे सांगितले की, टेबलवरही स्मार्टफोन ठेवण्याची अनुमिती असायला नको. त्यांची मुलं 20, 17, 14 वर्षांची आहेत आणि यापैंकी कोणाकडेच स्मार्ट फोन नाहीये. त्यामुळे वयाच्या 14 व्या वर्षांपर्यंत तरी मुलांकडे फोन नसावा, असे त्यांचे म्हणणे आहे. किड्स अँड टेक-द इवोल्यूशन ऑफ टुडेज डिजिटल नेटिव्हच्या रिपोर्टनुसार, लहान मुलांना त्यांचा पहिला फोन हा 10 व्या वर्षी द्यायला हवा. 

हल्ली पालक मुलं हट्ट करू नये म्हणून त्यांना फोन देतात. काही पालक 2-3 वर्षांच्या मुलांना देखील फोन देऊन मोकळे होतात. त्यामुळे अशावेळी पालकांना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांचे आरोग्य चांगले राखणे ही जबाबदारी पालकांची आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.