Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीड वर्षाच्या बाळाला उलटी झाली अन...., डॉक्टरांनीच घेतला बाळाचा जीव?

दीड वर्षाच्या बाळाला उलटी झाली अन...., डॉक्टरांनीच घेतला बाळाचा जीव?


बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात दीड वर्षांच्या बाळाला उलट्या होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या बालकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप बाळाच्या पालकांनी केला आहे. बीडच्या केज उपजिल्हा रूग्णालयातील हा प्रकार आहे. याप्रकरणी पीडित वडिलांनी जिल्हा शल्यचिकित्सकाकडे तक्रारही केली आहे.

बीडच्या केज येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या उपचारातील हलगर्जीपणामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बालकाचे वडील राहूल बाबासाहेब केंद्रे यांनी केजचे वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली आहे. तसंच दोषी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अनिकेत केंद्रे (वय दीड वर्षे) याला उलटी होत असल्याने केज उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना वारंवार कॉल करूनही ते वेळेत आले नाहीत. तसंच स्वतःच्या खाजगी रूग्णालयातून सरकारी रूग्णालयात दाखल झाले नाहीत. वेळेत उपचार मिळाला असता तर अनिकेत वाचला असता. हे सगळं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप पालकांनी केला आगे. यामुळे या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.