Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टरचे शेतात इमरजन्सी लँडिंग:, ग्रामस्थाचीं तोबा गर्दी

सांगलीत भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टरचे शेतात इमरजन्सी लँडिंग:, ग्रामस्थाचीं तोबा गर्दी 


सांगली जिल्ह्यातील एरंडोली येथे सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मिरज तालुक्यातील लँडिंग करण्यात आले. सुरक्षितपणे एका शेतात हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांची गर्दी झाली होती.

नाशिकहून बेळगावकडे जात असताना अचानक बिघाड झाला. त्यामुळे प्रसंगावधान राखून शेतात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. ग्रामस्थांनी गर्दी केल्यानंतर हेलिकॉप्टरमधील अधिकाऱ्यांनी व्हिडिओ रेकाॅर्ड न करण्याचे आवाहन केले. आपल्या गावी सुद्धा सैनिक असतील असे म्हणत अधिकाऱ्यांनी संवाद साधला. यावेळी हौशी तरुणांकडून हेलिकाॅप्टरजवळ जाऊन व्हिडिओ करण्याचा प्रय़त्न झाला. त्यामुळे गर्दी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना कळकळीचे आवाहन करावे लागले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.